Chalisgaon APMC election : भाजपच्या आमदार मंगेश चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला!

चाळीसगाव बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपच्या उमेदवारांत रस्सीखेच
MLA Mangesh Chavan
MLA Mangesh ChavanSarkarnama

Chalisgaon APMC election : चाळीसगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी व भाजप या दोन्ही गटांच्या पॅनलमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही गटांतील उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. (Mahavikas Aghadi`s big Challange for BJP MLA Mangesh Chavan)

भाजपचे (BJP) आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांच्यासाठी बाजार समितीची निवडणूक (APMC election) वैयक्तीक प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे त्यांनी शिंदे गटाला (Eknath Shinde) बरोबर घेत पॅनेल केले आहे. महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) मोठे आव्हान या निवडणुकीत आहे.

MLA Mangesh Chavan
Shivsena news : गुलाबराव काहीही म्हणोत, शिंदे गटाने घेतलाय उद्धव ठाकरेंचा धसका!

व्यापारी गटांत महाविकास आघाडीचे बाजार समितीचे विद्यमान संचालक व व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, आडत व्यापारी अरुण चौधरी तर भाजप व समविचारी पक्षाचे नीलेश वाणी व ज्ञानेश्वर चौधरी तसेच हमाल मापाडी गटांत महाविकास आघाडीचे अतुल चव्हाण व भाजपचे प्रभाकर घुमरे (खरजई) यांचे उमेदवारी अर्ज आहेत.

आमदार चव्हाण यांनी त्यांच्या १५ उमेदवारांची यादी जाहीर केली, ती अशी : सोसायटी (सर्वसाधारण) - कपिल पाटील (बहाळ), नवल पवार (दहिवद), प्रदीप पाटील (डोण), दगडू माळी (पोहरे), किशोर पाटील (करजगाव), शैलेंद्रसिंग पाटील (शिदवाडी), रवींद्र पाटील (नांद्रे), महिला गटांत अलकानंदा भवर (रहिपुरी), वनिताबाई पाटील (कळमडू), इतर मागास वर्गात रवींद्र पाटील (उंबरखेड), भटक्या जाती/वि.ज. मध्ये मच्छिंद्र राठोड (वलठाण).

MLA Mangesh Chavan
Ajit Pawar News : मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली, तर बिघडले कुठे?

ग्रामपंचायतींत सर्वसाधारणमध्ये हेमराज पाटील (ब्राह्मणशेवगे), राहुल पाटील (वाघडू), अनुसूचित जाती, जमातीमध्ये प्रभाकर जाधव (चाळीसगाव), आर्थिक दुर्बल घटक साहेबराव राठोड (तळोदे प्र.चा.), भाजप, शिवसेना, रिपाइं व समविचारी महायुतीच्या (स्व.) रामराव जिभाऊ शेतकरी सहकारी पॅनलचा प्रचार नारळ प्रारंभ पाटणादेवी येथे सकाळी नऊला फोडणार असल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले.

महाविकास आघाडीचे उमेदवार

राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना (उद्धव ठाकरे गट) या महाविकास आघाडीच्या उमेदवारांची यादी :सोसायटी (सर्वसाधारण) -दिनेश पाटील (बोरखेडा), महेंद्र पाटील (काकडणे), संजय पाटील (तळोदे), राजेंद्र पाटील (माळशेवगे), अशोक पाटील (जामदा), सागर साळुंके (खेडगाव), राजेंद्र माळी (मांदुर्णे), महिलांमध्ये रत्नाबाई पाटील (वाकडी), चंद्रकला पाटील (देवळी), आर्थिक दुर्बल रोहिदास लाला पाटील (बहाळ), भटक्या विमुक्त जाती जमाती श्यामलाल कुमावत (चाळीसगाव). ग्रामपंचायत सर्वसाधारण गट : शेषराव अहिरराव (खेडी), संजीव राठोड (वलठाण), आर्थिक दुर्बल- अनिल रमेश पाटील (बहाळ), अनुसूचित जाती जमातीत रोशन जाधव (चाळीसगाव)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com