शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या व्यापाऱ्यावर बाजार समितीची नोटीस

येथील बाजार समितीत शेतमाल विक्रीच्या वादातून शेतकरी व व्यापारी यांच्यात झालेल्या बाचाबाचीचे पर्यावसन हाणामारीत झाले.
Farmers beaten by traders atMalegaon
Farmers beaten by traders atMalegaonSarkarnama
Published on
Updated on

मालेगाव : येथील बाजार समितीत (Malegaon APMC traders beaten farmers) शेतमाल विक्रीच्या वादातून शेतकरी व व्यापारी यांच्यात झालेल्या बाचाबाचीचे पर्यावसन हाणामारीत झाले. व्यापाऱ्याने शेतकऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (VDO viral on social media) झाल्याने त्याची सर्वत्र चर्चा सुरू झाली. मंगळवारी मध्यरात्री एकच्या सुमारास हा प्रकार घडला.

Farmers beaten by traders atMalegaon
आमदार सरोज अहिरे अजितदादांशीही खोटे बोलल्या, त्यांना शिवसेनेचा झटका दाखवू!

शेतमाल न लावल्यामुळे पाचोरा येथील शेतकरी दिलीप पवार (रा. वसंतवाडी) यांना धनश्री व्हेजीटेबल कंपनीचे संचालक व्यापारी किशोर सरोदे यांनी सात-आठ जणांच्या मदतीने मारहाण केल्याचा आरोप व लेखी तक्रार पवार यांनी बाजार समितीकडे केली आहे. मारहाणीत शेतकऱ्याच्या तोंडाला जबर मार लागला आहे. मारहाण करताना व्यापाऱ्याने ‘तू मालेगावला आला, तर तुझी गाडी फोडून टाकेन व ठार मारेन’, असा दम दिल्याचे पवार यांनी तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीची दखल घेत बाजार समितीचे सचिव अशोक देसले यांनी धनश्री व्हेजीटेबलला नोटीस बजावत सात दिवसांच्या आत बाजार समितीकडे खुलासा करावा. लेखी खुलासा समाधानकारक न वाटल्यास समितीचा गाळा ताब्यात घेऊन तुमचा परवाना रद्द केला जाईल, असा इशारा नोटिशीत दिला आहे. या नोटीसची प्रत अध्यक्ष, भाजीपाला फळफळावळ असोसिएशन, पोलिस निरीक्षक कॅम्प पोलिस ठाणे व शेतकरी दिलीप पवार यांना पाठविली आहे. या मारहाणप्रकरणी वाद-विवाद व आरोप-प्रत्यारोपही सुरू आहेत.

Farmers beaten by traders atMalegaon
बच्चू कडूंना आव्हान, आत्मदहनाचा प्रयत्न, गजू घोडके आहेत कोण?

बाजार समिती शेतकरी हितासाठी आहे. शेतकरी बांधव बाजारात माल विक्रीसाठी आणतात. त्यावरच व्यापाऱ्यांचा व्यवसाय व समितीचे कामकाज चालते. बाजार समितीत कायद्याचे उल्लंघन, शेतकऱ्यांना मारहाण व दमबाजीचे प्रकार खपवून घेणार नाही. व्यापाऱ्यांनी शेतकरी बांधवांशी सौजन्याने वागले पाहिजे.

-राजेंद्र ऊर्फ भटू जाधव, सभापती, बाजार समिती, मालेगाव

शेतकऱ्याला मारहाण झाल्यानंतर त्याने तक्रार करताच समिती प्रशासनाने व्यापाऱ्याला सात दिवसांच्या आत लेखी खुलासा करण्याची व कारवाईसंदर्भात कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

-अशोक देसले, सचिव, बाजार समिती, मालेगाव

...

आपण कुठल्याही शेतकऱ्याला मारहाण केलेली नाही. संबंधित व्यक्ती वाहनचालक आहे. आमच्याकडे शेतमाल लावण्यासाठी तसेच त्याच्या गाडीचा अपघात झाल्यानंतर त्याला दहा हजार रुपये मदत केली आहे. संबंधित वाहनचालकाकडे आमचे ४० ते ५० हजार रुपये घेणे असून, आमचे पैसे देऊन शेतमाल कोठेही लाव, अशी चर्चा सुरू असतानाच अन्य काहीतरी कारणावरून या व्यक्तीला मारहाण झाली आहे. संबंधितांशी त्याचे वाद असू शकतात.

-किशोर सरोदे, व्यापारी, धनश्री व्हेजीटेबल कंपनी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com