Dhule Cash Controversy: अर्जुन खोतकरांवरील बालंट टळले; धुळे रोकडप्रकरणी फडणवीसांची ‘एसआयटी’ची घोषणा हवेतच?

Arjun Khotkar; Dhule cash case calmed down?, CM SIT members is a mystery -धुळे विश्रामगृहात अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या कक्षात सापडलेल्या १.८४ कोटींच्या रोकड प्रकरणी अद्याप गुन्हा नाही.
Anil-Gote-Arjun-Khotkar
Anil-Gote-Arjun-KhotkarSarkarnama
Published on
Updated on

Arjun Khotkar News: विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्यावरील रोकड प्रकरणाचे बालंट टळल्यासारखेच आहे. पक्षाचे नेते आणि वरिष्ठच त्यांच्या मदतीला धावून आले. त्यामुळे धुळे पोलीस आणि सर्व यंत्रणा याबाबत 'हाताची घडी तोंडावर बोट' या भूमिकेत आहेत.

धुळे आणि नंदुरबार दौऱ्यावर असलेल्या विधिमंडळ अंदाज समितीचे शिष्टमंडळ आणि त्याचा दौरा दोन्हीही वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नेते अर्जुन खोतकर या समितीचे प्रमुख होते. त्यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या कक्षात १.८४ कोटी रुपयांची रोकड आढळली होती. हे पैसे लाच देण्यासाठी होते असा उघड आरोप करण्यात आला होता.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी आमदार अनिल गोटे यांनी या प्रकरणी स्टिंग ऑपरेशन केले होते. याबाबत राज्यभर माध्यमांतून चर्चा झाली. त्यामुळे पोलिसांना त्यात उडी घ्यावी लागली. पोलिस आणि प्रशासनाने आता हे प्रकरण थंड बस्त्यात टाकण्याचे ठरविल्याचे दिसते, असे सध्याचे चित्र आहे. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे व यंत्रणेला सबंध यंत्रणा आठवडाभर तपास करूनही एक ओळीचाही गुन्हा दाखल झालेला नाही, हे चित्र बोलके आहे.

Anil-Gote-Arjun-Khotkar
Sudhakar Achwal : नाशिकच्या सुपुत्राचा इंग्लंडच्या राजकारणात झेंडा, बनले विंचेस्टरचे महापौर!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेत असल्याचे जाहीर केले होते. चौकशीसाठी ‘एसआयटी’ची घोषणा करण्यात आली. प्रत्यक्षात मात्र ही घोषणा हवेतच विरल्याचे चित्र आहे. ‘एसआयटी’ची चौकशी करण्यासाठी सदस्य कोण? हे कोणालाच माहिती नाही. त्यामुळे ही चौकशी आता बंद होते की काय? अशी भीती कार्यकर्त्यांना वाटू लागली आहे.

Anil-Gote-Arjun-Khotkar
Manikrao Kokate : पावसाचे राजकारण... उदय सांगळे यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना घेरले!

याबाबत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील ‘एसआयटी’ चौकशी बाबत विधान केले होते. विधान मंडळाचे अधिकारी किशोर पाटील या ठिकाणी काय करत होते? असा गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे त्यांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे. एवढे सगळे प्रकरण गाजत असताना त्याची चौकशीचे काय? याचे उत्तर मात्र काहीही नाही, असेच आहे.

या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांनी संबंधित रक्कम जिल्हा शासकीय कोषागारात जमा केली आहे. या प्रकरणाची माहिती व प्रकरण प्राप्तिकर विभागाकडे सोपविण्यात आले आहे. प्राप्तिकर विभाग याची चौकशी करणार असल्याने आता याबाबत पोलिसांत कोणताही गुन्हा दाखल होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

प्राप्तिकर विभाग संबंधित रकमेचे सोर्स तपासेल. हे सोर्स सापडल्यास त्यावर कर आकारणी आणि दंड केला जाऊ शकेल. नंतर शिल्लक रक्कम संबंधितांना परत केली जाईल. या स्थितीत विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्यावरील राजकीय बालंट आणि आरोप यातून ते सही सलामत सुटणार असे बोलले जाते.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com