Pune : आगामी विधानसभा(Legislative Assembly), लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपने संघटनात्मक बदल करीत खांदेपालट केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी आज (बुधवारी) राज्यातील जिल्ह्याध्यक्ष आणि शहराध्यक्षांची यादी जाहीर केली आहे. (Pune News)
पुणे ग्रामीण (बारामती) शहराध्यपदी वासुदेव काळे (Vasudev Kale) तर पुणे मावळ शहराध्यपदी शरद बुट्टे पाटील (Sharad Butte Patil) यांची निवड केली आहे. पुणे शहराध्यक्षपदी धीरज घाटे (Dheeraj Ghate) यांची नियुक्ती केली आहे. पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी शंकर जगताप (Shankar Jagtap) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मेकॅनिकल इंजिनिअर असलेले काळे हे दौंड तालुक्यातील शिरापूरचे रहिवासी आहेत. राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव, धडाडीचे नेतृत्व, महाविद्यालयीन शिक्षणानंतर राजकारणात आलेले वासुदेव काळे सुरुवातीपासूनच भाजपात कार्यरत आहेत. काळे यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत प्रस्थापितांच्या विरोधात १९९७ मध्ये विजय मिळवला होता.
वयाच्या 26 व्या वर्षी काळे जिल्हा परिषद सदस्य झाले, तर वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा त्यांनी सांभाळली. वासुदेव काळे यांच्या पत्नी माधुरी काळे यांनीही २००२ मध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत विजय मिळवला होता.
शरद बुट्टे पाटील तसेच अतुल देशमुख हे भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. दोघांनीही विधानसभेची तयारी सुरू केली आहे. सध्या खेड तालुक्यात दिलीप मोहिते पाटील हे आमदार आहेत.
चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून भारतीय जनता पक्ष जिल्हाध्यक्षांची नवी टीम घोषित करण्यात आली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी जवळपास 70 नावांची घोषणा केली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा (Legislative Assembly) आणि लोकसभेच्या (Lok Sabha) दृष्टीकोणातून भाजपची जोरदार तयारी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
बावनकुळे यांनी जिल्हाध्यक्षांची नवी टीम जाहीर केली आहे. राज्यातील केंद्रीय नेतृत्व, राज्याचे नेतृत्व आणि प्रदेश कार्यकारिणीशी चर्चा करून ७० संघटनात्मक जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे.
(Edited By : Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.