Ashok Kharat case action : भोंदूबाबा खरात प्रकरणात सीएम फडणवीसांची मोठी घोषणा; म्हणाले,'60 दिवसांच्या आतच....'

fast track chargesheet News : अशोक खरातप्रकरणी कडक कारवाई केली जाईल व याप्रकरणतील दोषीला सोडणार नसल्याचे स्पष्ट केले.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे बुधवारी सूप वाजले. अंतिम आठवडा प्रस्तावावर भाषण करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घोषणा केली आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांची भेळमिसळ होता कामा नये, आपल्या संतांनी देखील भोंदूगिरीला स्थान दिले नाही, असे स्पष्ट करताना अशोक खरातप्रकरणी कडक कारवाई केली जाईल व याप्रकरणतील दोषीला सोडणार नसल्याचे स्पष्ट केले. या संबंधित गुन्ह्यात 10 वर्षापेंक्षा कमी शिक्षा आहे, त्यामुळे 60 दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करण्याचा प्रयत्न सुरु आहे. ⁠महिलांच्या संदर्भात गुन्हे आहेत ते 60 दिवसांच्या आत दोषारोपपत्र दाखल करत आहेत. ⁠वकिलांना दोनपेक्षा जास्त अॅडजोनमेंट मागता येणार नाही, असे सीएम फडणवीस यांनी स्पष्ट केले.

विधिमंडळात बोलताना भोंदूबाबा आणि अंधश्रद्धेवर फडणवीसांनी जोरदार प्रहार केला. यावेळी त्यांनी अशोक खरात प्रकरणावर भाष्य केले. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांची भेळमिसळ होता कामा नये, आपल्या संतांनी देखील भोंदूगिरीला स्थान दिलं नाही. मात्र, त्यांनी देवाचं अस्तित्वही नाकारलं नाही असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी भोंदूगिरीला कुठंलही स्थान नसल्याचे म्हटले.

Devendra Fadnavis
Maharashtra Politics Update : दिवसभरात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) सभागृहात बोलताना म्हणाले की, ⁠भोंदूबाबा खरात संदर्भात निवेदन केले आहे, तसेच याप्रकरणी ज्यांच्याकडे माहिती आली असेल त्याची माहिती शासनाकडे द्यावी. ⁠या प्रकरणाने आपण कुठे जातो याचा विचार करण्याची गरज आली आहे. आपण सर्वजण श्रद्धा मानणारे आहोत मात्र श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात फरक आहे. ⁠अंधश्रद्धा पाळली की कसा विवेक हरवतो हे उदाहरण आहे. सर्वच संतानी देवाचं अस्तित्व स्वीकारलं आहे, नाकारलं नाही मात्र त्यांनी अंधश्रद्धेवर प्रहार केला.

Devendra Fadnavis
Mahayuti Government: मोठी बातमी: खरातशी जवळीक,महायुती सरकारमधील मंत्री अडचणीत? थेट राजीनाम्याची मागणी

जादुटोणा संदर्भात नियम अंतिम टप्प्यात आहेत. या कायद्याची अंमलबजावणी आपण केली आहे, जादुटोणा करुन समस्या संपल्या असत्या तर डोनाल्ड ट्रम्पचा सल्लागार म्हणून त्यालाच नेमला असता, असेही मुख्यमंत्र्यांनी उपरोधात्मकपणे म्हटले.

Devendra Fadnavis
Ashok Kharat Scam: चाकणकरांनंतर कुणाचा नंबर..? फडणवीसांनी सभागृहातूनच टाकलेल्या नव्या बॉम्बनं 'त्या' नेतेमंडळींसह अधिकाऱ्यांचंही 'काऊंटडाऊन' सुरू

हे सगळेच विषय त्या ठिकाणी संपले असते. युद्ध ड्रोनऐवजी लिंबू मिरचीनं लढलो असतो. पाकिस्तानच्या दहशतवादाला येथे बसून टाचण्यांनी संपवून टाकलं असतं, आणि सीमेवर सैनिक पाठवण्याची आवश्यकता पडली नसती. पाच दहा भोंदू बाबा पाठवले असते आणि आपली सीमा अगदी त्या ठिकाणी नीट झाली असती, असे सांगत भोंदूबाबा आणि अंधश्रद्धेवर फडणवीसांनी जोरदार प्रहार केला.

Devendra Fadnavis
Maharashtra political controversy : चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर SIT नेमणुकीवरून भास्कर जाधवांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले,' खरात प्रकरणाच्या चौकशीसाठी अधिवेशनापूर्वीच...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com