Ahilyanagar News : महायुतीमधील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारांची पहिली आणि दुसरी यादी जाहीर केली. पहिल्या यादीत अहिल्यानगर जिल्ह्यातून आमदार संग्राम जगताप, आमदार आशुतोष काळे, आमदार किरण लहामटे यांना उमेदवारी निश्चित झाली.
हे तिन्ही उमेदवार पुन्हा मैदान मारून अजितदादांचे हात राज्यात बळकट करणार का? अशी चर्चा रंगली आहे. परंतु यातील कोपरगाव आणि अकोले मतदार संघातील जागेवरून भाजप आणि अजितदादांमध्ये संघर्ष होता. परंतु विद्यमान असल्यानं इथं आमदार अजितदादांचे पारडं भार भरलं.
भाजपने पहिल्या यादीत 99 उमेदवार जाहीर केली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) पहिल्या यादीत 37, तर दुसऱ्या यादीत सात, अशी एकूण 45 उमेदवारांची घोषणा केली आहे. अजितदादांनी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी 18 उमेदवारांना पक्षाचे 'AB' फॉर्म दिले होते. त्यामुळे यादीविषयी उत्सुकता वाढली होती. कारण 'AB' फॉर्म न दिलेल्या उर्वरीत उमेदवारांमध्ये कोण? याची चर्चा होती. अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी जनसन्मान यात्रा काढली होती. या यात्रेतून त्यांनी अर्थसंकल्पात घोषणा केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर सर्वाधिक भर दिला. यासाठी त्यांनी गुलाबी रंग स्वीकारला.
आमदार संग्राम जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर अजितदादांची साथ दिली. ही त्यांची तिसरी टर्म आहे. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून (MVA) उमेदवार कोण असेल याची अजूनही उत्सुकता आहे. ती काही क्षणात मिटले. परंतु जेव्हा सत्ताधाऱ्याविरोधात चेहरा नसतो, तेव्हा जनता चेहरा असते. अशावेळी पुन्हा सत्ता खेचून आणणं असतं. तसंच काहीसं नगर शहर मतदारसंघात झालं आहे. एकतर्फी वाटत असलेला निवडणूक संग्राम जगताप यांना आता आव्हानात्मक वाटू लागली आहे. त्याचा युवा संघटनवर भर दिला आहे. माजी महापौर संदीप कोतकर आणि महाविकास आघाडीकडून माजी महापौर अभिषेक कमळमकर यांची उमेदवारीसाठी नावे सध्या चर्चेत आहेत. परंतु महाविकास आघाडीकडून ही जागा कोणाला, याची देखील उत्सुकता आहे.
कोपरगाव मतदार संघात महायुतीत पेच निर्माण होता. महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी संघर्ष होता. भाजपकडून माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र विवेक कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार आशुतोष काळे यांना वारंवार आव्हान देत होते. परंतु भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने अजितदादांचा उमेदवार आमदार काळे यांचा मार्ग काहीसा सुकर झाला आहे. राष्ट्रवादीकडून आमदार काळेंना उमेदवारी जाहीर झाली आहे. माजी आमदार कोल्हे आणि त्यांचे पुत्र विवेक कोल्हे यांची समजूत काढण्यासाठी फडणवीस यांना मायलेकाला दिल्लीत अमित शाह यांच्यासमवेत भेट घडवून आणली. या भेटीनंतर कोल्हे यांची भूमिका काहीशी मवाळ झाली आहे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांना उमेदवारी दिली आहे.
किरण लहामटे यांचा मतदारसंघ आदिवासी भाग आहे. अजितदादांची नुकताच इथं जनसन्मान यात्रा झाली. यानिमित्ताने किरण लहामटे यांनी मतदारसंघात जोरदार शक्तीप्रदर्शन केले. या मतदारसंघात देखील महायुतीमध्ये पेच आहे. भाजपचे दिग्गज नेते माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे पुत्र माजी आमदार वैभव पिचड भाजपकडून इच्छुक आहेत. उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत भाजप नेत्यांकडे फिल्डिंग लावली. तरी देखील राष्ट्रवादी यात वरचढ ठरली. अजितदादांनी आमदार लहामटे यांना संधी दिली. विवेक कोल्हे यांची भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी ज्यापद्धतीने समजूत काढली, तशी वैभव पिचड यांच्या वाट्याला आलेली दिसत नाही. त्यामुळे ते काय भूमिका घेतात, त्याचा काय परिणाम होतात, याकडे राजकीय धुरीचं लक्ष लागलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.