Shrigonda Politics : श्रीगोंद्यात मोठा ट्विस्ट; ठाकरेंकडून अनुराधा नागवडेंना उमेदवारी? राहुल जगतापांचा गंभीर 'हा' आरोप

Rahul Jagtap Vs Anuradha Nagawade in Shrigonda Assembly Election 2024 : श्रीगोंद्यात पक्षप्रवेशापूर्वीच अनुराधा नागवडे यांना उमेदवारी करण्यात आली जाहीर 'सांगली पॅटर्न'ची चर्चा सुरू झाली आहे. त्या नागवडे या अजित पवार गटाच्या महिला जिल्हा अध्यक्ष होत्या.
Anuradha Nagawade, Rahul Jagtap, Babanrao pachpute
Anuradha Nagawade, RAHUL JAGTAP Babanrao pachputeSarkarnama
Published on
Updated on

Shrigonda Assembly Constituency: श्रीगोंद्याचे माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राहुल जगताप यांनी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी असून पक्षा सुरू केली आहे. अशातच श्रीगोंद्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे.

श्रीगोंदा मतदारसंघाची जागा विकल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार राहुल जगताप (Rahul Jagtap) यांनी केला आहे.या त्यांच्या विधानामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

श्रीगोंद्यातून उमेदवारी न दिल्यास शरद पवार गटाचे माजी आमदार राहुल जगताप बंडाच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहेत. श्रीगोंद्यात सध्या भाजप नेते बबनराव पाचपुते (Babanrao Pachpute) आमदार आहेत.

तसेच भाजपकडून तिथे बबनरावांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना तिकीट जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आता राहुल जगतापांनी तिथं पुन्हा एकदा दंड थोपटले आहे.

Anuradha Nagawade, Rahul Jagtap, Babanrao pachpute
NCP MLA Prakash Solanke : अजितदादांचा 'नो रिस्क' फंडा; भावी आमदार म्हणून झळकले बॅनर पुतण्याचे अन् उमेदवारी 'रिटायर्ड' काकांना..!

आतापर्यंत काँग्रेस,भाजप तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार असा प्रवास करून श्रीगोंद्यातून पत्ता कट झाल्याने अनुराधा नागवडे अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात दाखल झाल्या आहेत. त्यांनी महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी पूर्ण फिल्डिंग लावली आहे. तसेच उद्धव ठाकरे त्यांना उमेदवारी देण्याची दाट शक्यता आहे. त्याचमुळे राहुल जगतापांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

महाविकास आघाडीकडून राहुल जगताप हे श्रीगोंदा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार समजले जातात. पण उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घडविलेल्या राजकीय भूकंपांचे हादरे सगळीकडेच बसले असून सर्वच राजकीय समीकरणे बदलली गेली आहेत.आघाडीत श्रीगोंद्याची शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला सुटल्यानंतर श्रीगोंद्यात नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

Anuradha Nagawade, Rahul Jagtap, Babanrao pachpute
Shivsena UBT News : उद्धव ठाकरेंची पहिली यादी जाहीर अन् अहिल्यानगरातील स्थानिक नेत्यांमध्ये संभ्रम!

श्रीगोंद्यात पक्षप्रवेशापूर्वीच अनुराधा नागवडे यांना उमेदवारी करण्यात आली जाहीर 'सांगली पॅटर्न'ची चर्चा सुरू झाली आहे. त्या नागवडे या अजित पवार गटाच्या महिला जिल्हा अध्यक्ष होत्या.

पण शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षात प्रवेशापूर्वीच नागवडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्याचमुळे आर्थिक लाभासाठी श्रीगोंद्याची उमेदवारी दिल्याचा आरोप राहुल जगताप यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com