Maharashtra BJP: बंडखोरांना भाजपचा हिसका; मुरकुटे अन् पाचपुतेंची हकालपट्टी

BJP Disciplinary action against Murkute and Pachpute: विधानसभा निवडणुकीत बंडखोरांविरुद्ध कारवाई करताना माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे आणि सुवर्णा पाचपुते यांच्यावर भाजपने मोठी कारवाई केली.
Balasaheb Murkute| Suvarna Pachpute
Balasaheb Murkute| Suvarna PachputeSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar News : दगाफटका नको म्हणून, भाजपने आता बंडखोरांविरोधात कारवाई बडगा उगरला आहे. भाजपने 37 मतदारसंघातील 40 बंडखोरांविरुद्ध कारवाई केली आहे. पक्ष शिस्तीचा भंग केल्याप्रकरणी या बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

भाजपचे नेवासा मतदारसंघातील माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे आणि श्रीगोंद्यातील पदाधिकारी सुवर्णा पाचपुते यांची हकालपट्टी केली. भाजपने बंडखोरांविरुद्ध कारवाई करताच, महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बंडखोरांविरुद्ध काय कारवाई करतो, याकडे लक्ष लागलं आहे.

भाजपकडून (BJP) उमेदवारी न मिळाल्याने नेवासा मतदारसंघातील माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी बंडखोरी केली. बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या पाठिंब्यावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले. मात्र पक्षाने माघार घ्यायला सांगूनही मुरकुटे यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने भाजपने त्यांच्यावर कारवाई करत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. भाजपकडे असलेली ही नेवासा विधानसभेची जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनाकडे गेली.

Balasaheb Murkute| Suvarna Pachpute
Ahilyanagar Election: काय व्हायचं ते होऊ देत! पाच माजी आमदारांनी पक्षादेश झुगारला

शिवसेनेकडे (Shivsena) ही जागा असली, तरी भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल लंघे यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली आहे. यामुळे अस्वस्थ झालेल्या बाळासाहेब मुरकुटे यांनी बंडखोरी कायम ठेवली. मुरकुटे यांच्या पाठोपाठ श्रीगोंदा मतदारसंघात सुवर्णा पाचपुते यांच्याविरुद्ध देखील भाजप पक्षाकडून कारवाई करण्यात आली आहे. सुवर्णा पाचपुते यांनी श्रीगोंदा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. भाजपकडून उमेदवारी मिळावी म्हणून, त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे पाठपुरावा सुरू होता.

Balasaheb Murkute| Suvarna Pachpute
Manoj jarange Patil: जरांगे म्हणाले ना, मात्र इरेला पेटलेले समर्थक ठाम; `या` मतदारसंघात उमेदवार देणारच!

महायुतीमधील 50 नेत्यांनी बंडाचे निशाण फटकावले होते. यात सर्वाधिक भाजपमधील होते. भाजपमधून तब्बल 19 जणांनी, तर शिवसेनेकडून 16 आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून एक जणाने बंडाचे निशाण फटकावले. भाजपने बंडखोरांची समजूत घालण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून चर्चा केली. काही ठिकाणी चर्चा यशस्वी ठरली. परंतु काही ठिकाणी चर्चा होऊन देखील बंडखोरी कायम राहिली. त्यामुळे शेवटी भाजपने बंडखोरांविरोधात कारवाईचा बडगा उचलला.

बंडखोरांविरुद्ध कारवाई व्हावी, असा सूर पक्षातील निष्ठावानांचा होता. कारवाई न केल्यास वेगळा संदेश जाईल. शेवटी भाजपने बंडखोरांविरुद्ध कारवाईचा बडगा उचलला. भाजपने कारवाई केल्यानंतर आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून बंडखोरांविरुद्ध काय कारवाई होते, याची उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com