Mahayuti News : शिंदेंचा माजी आमदार 'नॉट रिचेबल', तर अजितदादांचा उमेदवार शक्तिप्रदर्शनाच्या तयारीत

Mahayuti Alliance Trouble Shrirampur: श्रीरामपूर मतदार संघात शिवसेना उमेदवार माजी आमदार भाऊसाहेब कांबळे 'नॉट रिचेबल' झाल्याने महायुतीत पेच निर्माण झाला आहे.
Mahayuti News 1
Mahayuti News 1Sarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar News : महायुतीमधील बंडखोरी रोखण्यासाठी भाजप नेते जीवाचं पाणी करत असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर मतदारसंघात वेगळाच राजकीय पेच निर्माण झाला आहे.

महायुतीमधील एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमने-सामने असून उमेदवारीवर ठाम आहेत. यातच शिवसेनेचे उमेदवार माजी आमदार भाऊसाहेब कांबळे 'नॉट रिचेबल' झालेत. आज अर्ज मागे घेण्याच्या दिवशी श्रीरामपूर मतदारसंघात महायुतीत मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात महायुतीमधील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडून माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांना 'AB फॉर्म'सह अर्ज भरला आहे. दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार लहू कानडे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. तसंच शिवसेनेकडून इच्छुक असलेला माजी खासदार सदाशिव लोखंडे आणि त्यांचे पुत्र यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय. यामुळे श्रीरामपूर मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला असली, तरी मुंबईतून महायुतीकडून कोणता आदेश येतो, याकडे लक्ष लागलं आहे.

Mahayuti News 1
Babanrao Gholap : माजी मंत्री बबनराव घोलपांनी लेकीला काढली नोटीस, कारण...

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस असून, दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत आहे. श्रीरामपूर मतदारसंघात महायुतीत नेमकं काय घडते, याकडे आता लक्ष लागलं आहे. शिवसेनेचे उमेदवार माजी आमदार भाऊसाहेब कांबळे 'नॉट रिचेबल' झाले आहेत. यामुळे महायुतीत (Mahayuti) धावपळ उडाली असून, उमेदवारी अर्ज कोण माघारी घेतो, याची उत्सुकता वाढली आहे.

Mahayuti News 1
Muktainagar Constituency : भावजय करणार नणंदेविरोधात प्रचार; मुक्ताईनगरमध्ये धमाल उडणार

विधानसभा 2019 मध्ये काँग्रेस तिकिटावर निवडून आलेले आमदार लहू कानडे यांचे काँग्रेसने उमेदवारीचे तिकीट कापण्यात आले. त्यांनी लगेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत 'AB फॉर्म'सह उमेदवारी अर्ज भरला. अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी त्यांनी मतदारसंघात मेळावा आयोजित केला आहे. ते आपली भूमिका तिथं मांडणार आहेत. कार्यकर्त्यांनी यावेळी शक्तिप्रदर्शनाला सुरवात केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com