ShivSena UBT Vs BJP : संगमनेरमध्ये चाललंय तरी काय? शिवसेना'UBT'च्या माजी शहरप्रमुखाची भाजप शहराध्यक्षाला मारहाण

Shiv Sena UBT Leader Attacks BJP Chief Amar Katari : विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी संगमनेरमध्ये शिवसेना'UBT'च्या माजी शहरप्रमुख आणि भाजपच्या शहराध्यक्षामध्ये राडा झाला.
Sangamner Politics
Sangamner PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Sangamner Political News: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात यांच्यावरील आक्षेपार्ह विधानानंतर संगमनेर हळवं झालं आहे. थोड काहीही झालं तरी, त्याचे पडसाद आता थेट उमटतात. आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी देखील संगमनेरमध्ये वेगळाच राडा झाला.

शिवसेना'UBT' पक्षाचे माजी शहरप्रमुखाने भाजपचे शहराध्यक्ष यांना मारहाण केली. त्यामुळे संगमनेरमध्ये पुन्हा तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. या प्रकाराची गंभीर दखल घेत भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांनी शिवसेना'UBT'च्या पदाधिकाऱ्याविरोधात कडक कारवाईची मागणी संगमनेर पोलिसांकडे केली.

विधानसभा निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. संगमनेर मतदारसंघातून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थित उमेदवाराने अर्ज भरला. या दरम्यान, भाजप आणि शिवसेना'UBT' पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मारहाण केल्याची घटना घडली. शिवसेना'UBT' पक्षाचे माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी भाजपचे शहराध्यक्ष श्रीराम गणपुले यांना मारहाण केली, असा आरोप करण्यात आला आहे. यामुळे संगमनेरमध्ये पुन्हा तणाव निर्माण झाला.

हा सर्व प्रकार संगमनेरच्या प्रशासकीय भवनाजवळील एका चहाच्या टपरीवर झाल्याचे सांगितले जाते. भाजपचे (BJP) शहराध्यक्ष श्रीराम गणपुले बसलेले असताना अमर कतारी यांनी पाठीमागून येत काहीही न बोलता त्यांना मारहाण केली.

यात गणपुले यांच्या गळ्याती सोनसाखळी गहाळ झाली. गणपुले यांनी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात तक्रारीसाठी पोचले. त्यानंतर काही वेळातच मंत्री राधाकृष्ण विखे यांनी पोलिस ठाण्यात येत या घटनेत कडक कारवाईची मागणी केली. या प्रकारामुळे संगमनेर शहरात पुन्हा काही काळ तणावाचे वातावरण होते.

विखेंची कडक कारवाईची मागणी

श्रीराम गणपुले यांनी तक्रारीत अमर कतारी याने मागून घेत मानेवर चापटीने मारल्याचे म्हटले आहे. भाजपच्या शहराध्यक्षाला मारहाण झाल्याची खबर वाऱ्यासारखी संगमनेर शहरात पसरऱ्यानंतर कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात गर्दी केली होती.

मंत्री विखेंनी संगमनेर पोलिसांकडे याबाबत कडक कारवाईची मागणी केली. मंत्री विखे यांनी चिखली जळीत प्रकरणातील आरोपी शहरात खुलेआम फिरत असतानाही अद्याप अटक का होत नाही, असा सवाल पोलिस अधिकाऱ्यांना केला.

कतारी यांचा आरोप

शिवसेना'UBT' पक्षाचे माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी माझ्याविरोधात सुडभावनेने कारवाई होत आहे, असे आरोप केला. "मी मंत्री विखे यांची भाजपमध्ये येण्याची ऑफर नाकारली. त्यातून माझ्याविरोधात वेगवेगळे षडयंत्र रचले जात आहे. मंत्री विखे राज्याचे नेतृत्व करत आहेत. त्यांनी अशा छोट्या घटनांमध्ये लक्ष घालण्याचे काम करू नये", असा सल्ला देखील अमर कतारी यांनी दिला.

थोरातही पोलिस ठाण्यात...

दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात, शिवसेना'UBT' पक्षाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार सत्यजित तांबे यांच्यासह महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी देखील संगमनेर पोलिसांची भेट घेतली. या घटनेत चुकीच्या पद्धतीने कारवाई करू नये. सत्य घटना पडताळून घेऊन कारवाई करावी. दबावातून कारवाई होणार नाही, याची काळजी घेण्याची मागणी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com