Pawar Vs Shinde : भाजप आमदार शिंदे कशात 'पटाईत'; आमदार पवारांनी भरगच्च सभेत सगळं सांगितलं

MLA Rohit Pawar Criticizes BJP MLA Ram Shinde From Karjat Jamkhed Constituency : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भाजप आमदार प्रा. राम शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली.
Pawar Vs Shinde
Pawar Vs ShindeSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar News : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भापजचे आमदार प्रा. राम शिंदे यांच्यावर चांगलाच निशाणा साधला.

आमदार शिंदे कशात पटाईत आहे हे सांगून त्यांची चांगलीच खिल्ली उडवली. "राजकीय द्वेष, भेदभाव आणि कुरघोड्या करण्यातच माझा विरोधक पटाईत आहे", असा टोला आमदार पवारांनी शिंदेंना लगावला.

आमदार रोहित पवारांनी कर्जत-जामखेडच्या सभेत भाषणाच्या सुरवातीपासून भाजप (BJP) आमदार शिंदेंना 'लक्ष्य' केले. "माझा विरोधकाची विचारसरणी महान आहे. मुलांसाठी काहीतरी करतो, तरी त्यांच्या पोटात दुखते.

रोहित पवार गाडीच नाही, तर विमान आणि हेलिकॉप्टर देखील बदलतो. आलो सोन्याचा चमचा घेऊन जन्माला. पण तो चमचा सर्वसामान्यांच्या मदतीसाठी वापरतो", असा टोला पवारांनी शिंदेंना लगावला.

Pawar Vs Shinde
Thorat Vs Vikhe : आता थोरातांनी विखेंना ललकारलं; म्हणाले, 'होऊन जाऊ दे'

आमदार शिंदेंना कधीच विकास जमला नाही, अशी टीका करताना फक्त कुरघोड्या जमल्या. "राजकीय द्वेष, भेदभाव आणि कुरघोड्या करण्यातच माझा विरोधक पटाईत आहे. 12 खात्याचा बॅनरमंत्री असताना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या चोंडीचा विकास करता आला नाही.

विशेष म्हणजे, आपल्या मतदारसंघात मागे चार आणि पुढे चार गाड्या घेऊन फिरला. 2019च्या निवडणुकीत (Election) ट्रेलर पाहिला. आता 2024च्या निवडणुकीत पूर्ण पिक्चरच दाखवतो", असा इशारा आमदार पवारांनी दिला.

Pawar Vs Shinde
Jayant Patil : 'घोषणाबाजांची खुर्ची जनताच हिसकावून घेणार'; जयंत पाटलांची भरपूर टोलेबाजी

आता सहनशक्तीचा अंत होतोय

"केंद्रात, राज्यात सरकार असताना 'हिंदू खतरे मे हैं' म्हणतात. मग सोडा सत्तेची खुर्ची आणि पाहा आमच्या सरकारात सगळे कसे गुण्यागोविंदाने राहतात. यंदा अंदाज घेऊनच मतमोजणीला या. अन्यथा परत मागच्या दाराने जायची वेळ येऊ देऊ नका.

पाच वर्षांपूर्वी बच्चा होतो. आता मोठा झालो आहे. फार बॅनरबाजी करू नका, आता लिमिट क्रॉस होतंय. आता सहनशक्तीचा अंत होतोय", असा इशारा राम शिंदे आणि त्यांच्या वाचाळवीरांना आमदार पवारांनी दिला.

"झुकेगा नही साला"

'ईडी' आली, पण झुकलो नाही. "झुकेगा नही साला" म्हणत केंद्र आणि राज्य सरकारला आमदार पवारांनी फटकारले. "भूमिपुत्रावर बोलताय अरे बाबा पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे असताना ते उत्तर प्रदेशमधून का लढतात? त्यांना विचारायची एकदा हिंमत करा, शिंदे साहेब. राखीची शपथ घेऊन सांगतो कर्जतची गुंडागर्दी मोडीत काढतो. लाडकी बहीण योजना चालूच राहील", असा विश्वास आमदार पवारांनी यावेळी दिला.

राम शिंदे कसले भूमिपुत्र

भाजप आमदार राम शिंदे यांच्याकडे कसलेच मुद्दे नसल्याने भूमिपुत्र म्हणून मतदारसंघात वावरत आहे. मात्र ते मूळचे धाराशिव जिल्ह्यातील येडशीचे आहेत. हे त्यांनी सत्य स्वीकारावे. मतदारसंघ तुमच्या या खोट्या प्रचाराला बळी पडणार नाहीत, असा टोला आमदार रोहित पवारांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com