Assembly Elections : काँग्रेसची पहिली यादी 'या' तारखेला येणार, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचही ठरलं

Maharashtra Assembly Elections NCP Sharad pawar Congress : शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची पहिली उमेदवार यादी शनिवार जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Congress-NCP
Congress-NCPSarkarnama
Published on
Updated on

Assembly Elections : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता घोषित झाली आहे. महाविकास आणि महायुतीमधील जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. महाविकास आघाडीतील जागा वाटप होत आले असून ज्या जागांवर एकमत होत नाही त्या जागांमध्ये काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिल्लीत निर्णय घेणार आहेत.

महाविकास आघाडीतील महत्त्वाचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात मोठ्या प्रमाणात इन्कमिंग होत आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांची पहिली यादी 19 ऑक्‍टोबरला जाहीर होण्याची शक्यता आहे, असे वृत्त साम टिव्हीने दिले आहे.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची पहिली उमेदवार यादी शनिवार (ता.19) जाहीर होण्याची शक्यता असताना काँग्रेसची पहिली उमेदवार यादी रविवारी (ता.20) जाहीर होणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. तर मुंबईती 36 पैकी 33 जागांवर एकमत झाल्याचे देखील काँग्रेस नेते सांगत आहेत.

Congress-NCP
Ghansawangi Assembly Constituency 2024 : शिवसेनेच्या शिवाजी चोथेंचा दावा, घनसावंगीत टोपेंची डोकेदुखी वाढणार !

'ते' रिपोर्टकार्ड नाही रेटकार्ड

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये महायुतीचे रिपोटकार्ड मांडण्यात आले. महायुतीच्या सरकारच्या काळात झालेल्या विकासकामांची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. मात्र,काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुतीच्या विकासाच्या दाव्यांची पोलखोल केली.

पटोले म्हणाले, राज्यातील उद्योगधंदे दुसऱ्या राज्यात गेल्याने महाराष्ट्रात बेरोजगारांची फौज बनली आहे. उद्योगधंदे गुजरातला व गुजरातचे ड्रग्ज राज्यात आणून तरुण पिढी बरबाद करण्याचे पाप या सरकारने केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिपोर्टकार्ड वर बोलणे हास्यास्पद आहे, त्यांनी रेटकार्ड वर बोलले पाहिजे असा टोलाही पटोलेंनी युती सरकारला लगावला आहे.

Congress-NCP
Security of Leaders : अडवाणी, योगींसह देशातील 9 VIP नेत्यांच्या सुरक्षेत मोठा बदल; कोण आहेत हे नेते?  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com