Ahilyanagar News : अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी इच्छुक असलेले माजी महापौर संदीप कोतकर यांच्या उमेदवारीला महाविकास आघाडी म्हणून जोरदार विरोध केला. यानंतर 'मविआ'तील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी महापौर अभिषेक कळमकर यांना उमेदवारी जाहीर झाली.
आता त्यांच्या उमेदवारीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसकडून कडवा विरोध होऊ लागला आहे. एकंदर 'मविआ'त बिघाडी होऊ लागली आहे. शिवसेना'UBT'ने बंडाचे निशाण फडकवत, बैठक घेत पक्ष नेतृत्वाला आव्हान दिलं आहे. अर्ज दाखल करण्याचा उद्याचा शेवटचा दिवस असल्याने आणि त्यानंतर उमेदवारी माघारी घेण्याची संधी असल्याने या काळात बरच काही राजकीय नाट्य रंगणार असल्याचे बोलले जात आहे.
शरद पवार यांचे विश्वासू माजी आमदार दादा कळमकर यांचे पुतणए माजी महापौर अभिषेक कळमकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाली. यानंतर त्यांनी शहरात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. परंतु आता त्यांच्या उमेदवारीला मविआतील मित्रपक्ष शिवसेना'UBT'आणि काँग्रेसने विरोध केला सुरू केला आहे.
यातून महाविकास आघाडीत बिघाडी दिसू लागली. शिवसेना'UBT' पक्षाने मंगळवारी (ता. 29) जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे आणि माजी महापौर भगवान फुलसौंदर यांचे अर्ज दाखल करण्याचे नियोजन केलं आहे.
शिवसेना'UBT' पक्षाचे हे नियोजन सुरू असतानाच काँग्रेसचे (Congress) शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे फिल्डिंग लावली आहे. खासदार सुळे यांची त्यांनी पारनेर दौऱ्यावर भेट घेतली. त्यानंतर तेथून खासदार सुळे यांनी त्यांना हेलिकॉप्टरमध्ये घेत मुंबई दौरा केला. हा दौरा उमेदवारी बदलची नांदी, तर ठरणार नाही ना, अशी देखील चर्चा आहे.
शिवसेना'UBT' पक्षाचे स्थानिक नेते अभिषेक कळमकर यांना उमेदवारी जाहीर झाले म्हणून चांगलेच अस्वस्थ आहेत. सुरवातील सामूहिक राजीनामे देण्याचा निर्णय जाहीर केला. परंतु त्यावर घुमजाव करत बंडखोरीचा विचार सुरू केला आहे. यासाठी बैठकांचे सत्र सुरू असून, आता एकत्रितपणे शहरातून शिवसेना'UBT' पक्षाला जिंकवण्यासाठी प्रा. शशिकांत गाडे व माजी महापौर भगवान फुलसौंदर या दोघांनी उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय केला.
मात्र, या दोघांनीच का, असा प्रश्न पुढे आल्याने पुन्हा आज सोमवारी दुपारी 1 वाजता पुन्हा बैठक आयोजित केली गेली. या बैठकीत अर्ज भरायचे की नाही, भरायचे तर कोणी-कोणी भरायचे, यावर खल सुरू आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवार जाहीर झाली असल्याने माजी महापौर अभिषेक कळमकर उमेदवारीवर ठाम आहेत. अर्ज दाखल करणार आहे. अर्ज दाखल करताना मविआतील शिवसेना'UBT' पक्ष आणि काँग्रेसचे सहकारी नसल्याने ते काहीसे एकाकी पडल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.