Saam Exit Poll 2024 : लोकप्रियता अनुराधा नागवडेंची, परंतु कौल पाचपुतेंच्या बाजूने; 'विक्रम' होणार? ...पाहा VIDEO

Anuradha Nagawade and Pachpute electoral battle in Shrigonda: अहिल्यानगरमधील श्रीगोंदा मतदारसंघात अनुराधा नागवडे यांच्या विजयाची चर्चा असतानाच, एक्झिट पोलने मात्र कौल वेगळाच दिला आहे.
BJP Vikram Pachpute
BJP Vikram PachputeSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar News : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ऐनवेळेला सोडून पुढच्या 12 तासात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत उमेदवारी करणाऱ्या अनुराधा नागवडे यांची श्रीगोंद्यात लोकप्रियता खूप आहे. यातून त्या विजयाच्या जवळ असल्याची चर्चा संपूर्ण निवडणुकीत होती.

परंतु आमदार बबनराव पाचपुते यांनी भाजपश्रेष्ठींकडून त्यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांची उमेदवार रद्द करून मैदानात उतरवलेले त्यांचे पुत्र विक्रम पाचपुते यांना 'एक्झिट पोल'मध्ये पसंती मिळताना दिसते. यामुळे श्रीगोंद्याच्या उद्याच्या निकालाची उत्सुकता वाढली आहे.

निवडणुका जाहीर होताच श्रीगोंद्यात बऱ्याच नाट्यमय घडामोडी झाल्या. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाकडून माजी आमदार राहुल जगताप इच्छुक होते. परंतु ही जागा मविआमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटली. त्यामुळे इथं उमेदवार कोण याची उत्सुकात होती.

BJP Vikram Pachpute
Vidhansabha Election Exit Poll 2024 : मोनिका राजळेंनी वारं फिरवलं? 'एक्झिट पोल'नुसार हॅटट्रिक निश्चित...पाहा VIDEO

महायुतीत (Mahayuti) ही जागा भाजपला सुटली. त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असलेले अनुराधा नागवडे आणि राजेंद्र नागवडे या दाम्पत्यांनी अजितदादांची साथ सोडली आणि शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश केला. प्रवेश करताच अवघ्या १२ तासांत त्यांनी उमेदवारी मिळवली आणि निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. तत्पूर्वी कोणत्याही परिस्थिती निवडणुकीच्या रिंगणात असतील, असे अनुराधा नागवडे वारंवार म्हणत होत्या. शिवसेना ठाकरे पक्षाकडून अनुराधा नागवडे मैदानात उतरताच मविआतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बंडखोर माजी आमदार राहुल जगताप यांना तंबी देण्यात आली. तरी देखील त्यांनी उमेदवारी कायम ठेवली.

BJP Vikram Pachpute
Sharad Pawar : शरद पवारांनी सरकार स्थापनेचा आकडा सांगितला; 'मविआ'चा 'कॉन्फिडन्स' वाढला

शरदचंद्र पवार पक्षाने राहुल जगतापांवर कारवाई केली. दुसरीकडे भाजपने आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी जाहीर केली. पाचपुते दाम्पत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे धाव घेऊन पुत्र विक्रम पातपुतेंना भाजपचा उमेदवार म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरवले. श्रीगोंदा मतदारसंघात तिरंगी लढत आहे. त्यामुळे तिथे कोणाची लाॅटरी लागणार याची उत्सुकता आहे. यासाठी पैजा देखील लागल्या आहेत.

ताकद दोन्ही बाजून लागलीय

भाजपचे उमेदवार विक्रम पाचपुते यांनी लोकसभा निवडणुकीपासूनच तयारी सुरू केली होती. एखाद्या कसलेल्या उमेदवाराप्रमाणे ते या निवडणुकीला समोरे केले. भाषणात विकासाच्या मुद्यांबरोबर विरोधकांचा समाचार घेत होते. देहबोली सकारात्मक ठेवली होती. युवा असल्याने ते मतदारांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरले. त्यांचे प्रतिस्पर्धी अनुराधा नागवडे यांच्याविषयी सहानुभूती लाट होती. महिलांमधून त्यांना पसंती मिळाली. त्यांचे पती राजेंद्र नागवडे यांनी जुने आणि नवीन कार्यकर्त्यांनी सरमिसळ व्यवस्थितपणे घालून निवडणुकीला संघटनात्मरित्या समोरे गेले.

पारावर चर्चा रंगल्या

बंडखोर अपक्ष माजी आमदार राहुल जगताप वरील दोन्ही उमेदवारांपेक्षा अनुभवी होते. युवक आणि तरुणांची मोठी ताकद त्यांच्यामागे उभी आहे. त्या जोरावर त्यांनी निवडणुकीत करिष्मा करायचे ठरवले. यात त्यांना कितपत यश आले, याची उत्सुकता उद्या निकालाच्या दिवशी संपेल. दरम्यान. एक्झिट पोलनुसार भाजपचे उमेदवार विक्रम पाचपुते यांच्या बाजून कौल दिसत आहे. परंतु सर्वाधिक चर्चा अन् पसंती अनुराधा नागवडे यांना असल्याचे सांगितले जाते. यातच माजी आमदार राहुल जगताप यांना देखील लाॅटरी लागू शकते, अशा देखील पारावर चर्चा रंगल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com