ऐकावे ते नवलच...निवडणूक लढविण्यासाठी बायको हवी!

औरंगाबादमधील बॅनरची नाशिकमध्ये तुफान चर्चा
Aurangabad 'Bayko Pahije' Banner News
Aurangabad 'Bayko Pahije' Banner NewsSarkarnama
Published on
Updated on

निफाड : औरंगाबाद (Aurangabad) महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या निमित्ताने तेथील गुलमंडी परिसरात लागलेल्या एक बॅनरची नाशिकमध्ये (Nashik) तुफान चर्चा सुरू आहे. ‘निवडणूक लढविण्यासाठी बायको हवी अशा आशयचा हा बॅनर सध्या जिल्ह्यात सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

Aurangabad 'Bayko Pahije' Banner News
गुलाबराव पाटील, गिरीश महाजनांची मैत्री पक्षनिष्ठेवरही भारी..!

संबंधिताला तीन अपत्यामुळे निवडणूक लढविता येणार नाही, मात्र दोन अपत्ये असलेली विधवा, घटस्फोटीत महिला असली तरी पत्नी म्हणून चालेल, पण जनहितासाठी आपण नाही तर आपली पत्नी प्रतिनिधित्व करेल अशा अगम्य इच्छेतून लावलेल्या बॅनरवर जोरदार चर्चा सुरू आहे. लोकेच्छेमुळे आपण वॉर्डासाठी हहेकरत असल्याचे त्याने बॅनरवर लिहिले आहे, जे चुकीचे आहे. (Aurangabad 'Bayko Pahije' Banner News)

Aurangabad 'Bayko Pahije' Banner News
ठासून सांगा `आपण सर्व गांधीदूत`

गुलमंडी भागात लावलेला हा बँनर औरंगाबाद जिल्ह्यातच नव्हे तर नाशिकसह अनेक जिल्ह्यात सोशल मिडीयाच्या माध्यमातून तुफान व्हायरंल होत आहे. दरम्यान हा अशी मागणी करणारा हा बॅनरचा महिलांनी तीव्र निषेध करीत ते फाडून टाकला असून संबंधिताविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यत सरू होती असे आमच्या औरंगाबाद येथील बातमीदारांनी कळविले आहे.

निवडणुकीच्या प्रचाराचे अनेक प्रकारचे बॅनर आजपर्यत आलेत, पण हा विलक्षण बॅनर अनेकांनाबुचकळ्यात टाकणारा आणि संदेह निर्माण करणाराही ठरत आहे. गुलमंडीमध्ये निवडणूक लढवण्यासाठी बायको हवी आहे, अशा आशय असलेला बँनर लावलेला आहे. हा बॅनर आहे तीन अपत्य असल्यामुळे २०२२ ची महापालिका निवडणूक लढविण्यासाठी बायको हवी आहे, बँनर विनोदी, विचार करायला लावणारा आहे. या व्यक्तींने संपर्क क्रमांकही दिला आहे. हे बॅनर लावले ३५ वर्षे वयाच्या रमेश पाटील नावाच्या व्यक्तीने. रमेश पाटील यांना औरंगाबाद नगरपालिकेची येऊ घातलेली निवडणूक लढवायची आहे, पण नियमामुळे त्यांना तीन अपत्य असल्यामुळे निवडणूक लढवता येत नाही, त्यासाठी त्यांनी आता दुसऱ्या पत्नीचा शोध सुरू केला आहे.

त्यासाठी हे बॅनर लावले आहे, अर्थात दुसरी पत्नी केली तरी निवडणूक लढविता येईलच असे नाही, पण त्यांच्या या बॅनरची खूपच चर्चा होत असल्याने प्रत्येक जण नेमकी काय भानगड आहे हे पाहण्यासाठीही पोस्ट आवर्जून पाहत आहेत. त्याला नाशिकच्या आगामी पहापालिका निवडणुकीची जोड देत कुणावर अशी वेळ येणार आहे याची खमंग चर्चा मात्र रंगू लागली आहे.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com