farmer loan Waiver : लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय : कोकाटेंपाठोपाठ आणखी एका मंत्र्याच्या जीभेवरील ताबा सुटला

Babasaheb Patil Controversial Statement on Farmer Loan Waiver : माणिकराव कोकाटे यांच्यानंतर अजित पवार यांच्या आणखी एका मंत्र्याने शेतकऱ्यांविषयी असंवेदनशील वक्तव्य केलं.
 Ajit Pawar and Manikrao Kokate
Ajit Pawar and Manikrao KokateSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra politics : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे व कृत्यांमुळे विद्यमान सरकार अडचणीत आल्याचं यापूर्वी अनेक प्रकरणांमध्ये दिसून आलं आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते माजी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी अनेकदा शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरुनही सरकारच्या अडचणी वाढल्या होत्या.

त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपआपल्या मंत्र्यांना समज दिली होती. जपून बोलण्याचा सल्ला मंत्र्याना दिला होता. पण या मंत्र्यानी आपल्या पक्षप्रमुखांचा सल्ला काही मनावर घेतलेला दिसत नाही. तत्कालीन कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांविषयी संवेदनाशून्य विधान केलं आहे.

जळगावमधील एका कार्यक्रमात सहकारमंत्री म्हणाले की, लोकांना कर्ज माफीचा नाद लागलाय. आम्हाला निवडून यायचं म्हणून काहीतरी आश्वासन निवडणुकीच्या वेळी देतोच, पण काय मागायचं ते लोकांनी ठरवलं पाहिजे. असं वादग्रस्त विधान बाबासाहेब पाटील यांनी केल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा रोष सरकारने ओढावून घेतला आहे.

 Ajit Pawar and Manikrao Kokate
BJP Mama Rajwade : फडणवीसांच्या दौऱ्यापूर्वी पोलिसांची अॅक्शन, भाजपच्या मामा राजवाडेंची 15 तास कसून चौकशी

बाबासाहेब पाटील पुढे म्हणाले की, निवडणुकीच्या काळात समजा कोणी गावात नदी आणून द्या, अशी मागणी केली व त्यालाच आम्ही मतदान देऊ असं सांगितलं. तर निवडून यायचे असल्याने नदी आणून दिल्याचं आश्वासन दिलं जातं," पण काय मागायचं हे लोकांनी ठरवलं पाहीजे असं विधान बाबासाहेब पाटील यांनी यावेळेस केलं. बाबासाहेब पाटलांच्या या वक्तव्यामुळे शेतकरी संघटनांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विरोधकांनीही या वक्तव्यावरुन आता महायुती सरकारवर टीका केली आहे.

 Ajit Pawar and Manikrao Kokate
Jalgaon crime : केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या पेट्रोलपंपावर दरोडा, कर्मचाऱ्यांना मारहाण करत लाखोंची लूट

राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थिती ओला दुष्काळ जाहीर करुन सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून तसेच विरोधी पक्षांकडून होत आहे. निवडणुकीच्या काळात महायुती सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. त्याचीच आठवण सत्ताधाऱ्यांना करुन दिली जात आहे. एकीकडे सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पॅकेज जाहीर केले आहे, असे असताना सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी अशाप्रकारे विधान केल्याने शेतकऱ्यांना राग अनावर झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com