Bacchu kadu : बच्चू कडूंच्या चक्काजाम आंदोलनाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा!

Bacchu Kadu protest : दिव्यांगांचे प्रश्न आणि शेतकरी कर्जमाफी या विषयावर बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन केले होते. आता बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला इशारा दिला आहे. बच्चू कडू यांनी राज्यभर चक्काजाम आंदोलनाची घोषणा केली आहे.
bacchu kadu sharad pawar
bacchu kadu sharad pawarsarkarnama
Published on
Updated on

Bacchu Kadu Protest : दिव्यांगांचे प्रश्न आणि शेतकरी कर्जमाफी या विषयावर बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन केले होते. आता बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला इशारा दिला आहे. बच्चू कडू यांनी राज्यभर चक्काजाम आंदोलनाची घोषणा केली आहे.

महायुती सरकारने सत्तेवर येण्याआधी दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालयात विविध योजना सुरू करण्याची घोषणा केली होती. राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात येणार होती. शेतकर्‍यांच्या विविध योजना जाहीर करू नये महायुती सरकार त्याबाबत कोणताही निर्णय घेण्यास तयार नाही.

या प्रश्नाकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन त्याची तातडीने सोडवणूक करावी अशी मागणी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे. या संदर्भात येत्या 24 जुलैला राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात दिव्यांग तसेच प्रहार संघटनेसह विविध संस्था कडू यांच्याबरोबर आंदोलनात उतरणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार भास्करराव भगरे यांनी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. संदर्भात खासदार बकरे यांनी कडू यांना पत्र लिहिले आहे. शेतकर्‍यांची कर्जमाफी आणि दिव्यांग आणि निराधार महिलांना शासनाने सहा टक्के निधीतून योजना राबवाव्यात याबाबत केंद्र आणि राज्य शासनाचे लक्ष वेधण्याचे खासदार भगरे यांनी जाहीर केले आहे.

bacchu kadu sharad pawar
Islampur name change : इस्लामपूरचे नाव बदलणार; पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मोठी घोषणा: केंद्र सरकारकडे पाठवला प्रस्ताव

या आंदोलनाचा पहिला टप्पा गुरुकुंज मांजरी येथे माजी राज्यमंत्री कडू यांनी केलेल्या अन्न त्याग आंदोलनाने सुरू झाला होता. यासंदर्भात राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तसेच अन्य मंत्र्यांनी बच्चू कडू यांची भेट घेऊन कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कर्जमाफी योग्यवेळी करण्यात येईल असे जाहीर केले होते.

सध्या, मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत कोणत्याही हालचाली होताना दिसत नाही. राज्य शासनाकडे केलेल्या पाठपुराव्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने कडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्याचा पुढचा भाग म्हणून येथे 24 जुलैला राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये चक्काजाम आंदोलन करण्याची घोषणा कडू यांनी नुकतीच फिश म्हणजे यंदा या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पर पक्षाच्या काही नेत्यांनीही जाहीर पाठिंबा दिला आहे.

bacchu kadu sharad pawar
Raj Thackeray Warns Devendra Fadnavis : 'तडजोड करणार नाही याच्याआधी....', राज ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना इशारा

या निमित्ताने आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या मात्र उत्साहाने निवडणुकीत आश्वासने दिलेल्या महायुती सरकारच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे. दिव्यांग आणि निराधार महिलांच्या प्रश्नांबाबत प्रहार संघटना आक्रमक आहे. शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावर राज्यभरातील विविध संघटना आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी कडू यांना या आधीच पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे चक्काजाम आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोण कोण नेते पुढे येतात याची आता उत्सुकता लागली आहे. त्याने सरकारची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com