Raj Thackeray Warns Devendra Fadnavis : 'तडजोड करणार नाही याच्याआधी....', राज ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना इशारा

Raj Thackeray Devendra Fadnavis  Marathi Language : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले म्हणे की आम्ही तिसरी हिंदी भाषा सक्तीची करणार म्हणजे करणार. जर राज्य सरकारला आत्महत्या करायची असेल तर त्यांनी बेशक करावी, असे राज ठाकरे म्हणाले.
Raj Thackeray & Devendra Fadnavis
Raj Thackeray & Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Raj Thackeray News : मीरा-भाईंदरमध्ये राज ठाकरेंची सभा झाली. या सभेत राज ठाकरे हे मराठीच्या मुद्यावर प्रचंड आक्रमक झालेले दिसले. हिंदी लादण्यावरून सरकारला इशारा देत म्हणाले, तुमची सत्ता असेल ती विधानभवनामध्ये, लोकसभेमध्ये. आमची सत्ता रस्त्यावर आहे. जर महाराष्ट्रात कोणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर माझा महाराष्ट्र सैनिकाचा हात अन् समोरच्याचा गाल यांची युती झाल्याशिवाय राहणार नाहीत.

मराठीच्या मुद्याची स्क्रीप्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच लिहिल्याचा आरोप केला जात होता. त्याला देखील राज ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, 'अनेक सरकारी पत्रकार असतात, बेरोजगार पत्रकार असतात ते कोणत्या युट्यूब चॅनेलवर जातात आणि म्हणतात फडणवीसांनी लिहिलेली स्क्रीप्ट आहे. कोणता स्क्रीप रायटर आहे जो स्व:ताचा अपमान पण लिहितो त्यात. सगळ्यांकडून दबाब आल्यानंतर हिंदी सक्तीचे दोन्ही जीआर मी मागे घेत आहे, हे स्क्रीप रायटर लिहू शकतो? पण तुमच्या मनात विष कालवायचे सुरु आहे.'

देवेंद्र फडणवीसांचे नाव न घेत थेट इशारा देत ठाकरे म्हणाले, 'कोणाशी माझी मैत्री असो दुश्मनी असो काहीही असो एक गोष्ट निश्चित सांगतो महाराष्ट्राच्या बाबतीत, मराठी माणसाच्या बाबतीत आणि मराठी भाषेच्या बाबतीत राज ठाकरे कोणीशी तडजोड करणार नाही. याच्या आधी केली नाही आताही करणार नाही आणि यानंतरही करणार नाही.'

Raj Thackeray & Devendra Fadnavis
Maharashtra monsoon session: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे सूप तर वाजले, पण ठोस निर्णय कुठे? जनतेला काय मिळाले?

...तर शाळाही बंद पाडेल

'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले म्हणे की आम्ही तिसरी हिंदी भाषा सक्तीची करणार म्हणजे करणार. जर राज्य सरकारला आत्महत्या करायची असेल तर त्यांनी बेशक करावी. त्या दिवशी मोर्चाच्या धसक्याने निर्णय मागे घ्यावा लागला होता. फडणवीसजी तुम्ही सांगताना तिसरी भाषा सक्तीची आम्ही आणणार म्हणजे आणणार. मी आत्ता सांगतोय तुम्ही पहिली ते पाचवी हिंदी आणण्याचा प्रयत्न तर करून बघा दुकानंच नाही शाळाही बंद करीन.', असा इशाराही राज ठाकरेंनी दिला.

Raj Thackeray & Devendra Fadnavis
Gopichand Padalkar : बाहेर आव्हाडांना भिडलेले पडळकर सभागृहात दादा भुसे अन्‌ तालिका अध्यक्षांना भिडले; ‘माझी लक्षवेधी रद्द करा’

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com