Bachchu Kadu Politics: चांदवड मध्ये बच्चू कडूंचा `प्रहार` काँग्रेसवर, भाजपची झाली सोय!

Bachchu Kadu Chandwad Politics: आमदार बच्चू कडू यांनी चांदवड मतदार संघात उमेदवार जाहीर केल्याने आघाडीची कोंडी.
Bacchu Kadu, Shirish Kotwal & Ganesh Nimbalkar
Bacchu Kadu, Shirish Kotwal & Ganesh NimbalkarSarkarnama
Published on
Updated on

Bacchu Kadu News: विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या आघाडीची जोरदार जमवाजमव सुरू आहे. आमदार बच्चू कडू यांनी या आघाडीत सामील झाल्याचे जाहीर केले आहे. ही आघाडी भाजपला फायदेशीर ठरणार का याची चर्चा आहे.

आमदार बच्चू कडू काल नाशिक दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी तिसऱ्या आघाडीच्या संभाव्यरचनेबाबत माहिती दिली. तिसऱ्या आघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वराज्य या पक्षांसह प्रहारचा समावेश असेल.

ही आघाडी राज्यभर प्रभावी ठरेल का? याबाबत चर्चा आहे. तिसऱ्या आघाडीकडून निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा करण्यास सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीकडून संधी चुकलेले अनेक उमेदवार तिसऱ्या आघाडीला आयतेच मिळण्याची चिन्हे आहेत.

तिसऱ्या आघाडीत सद्यस्थितीत प्रहार ही संघटना गाजावाजा आणि प्रचार तंत्रात इतरांपेक्षा उजवी आहे. त्यांच्याकडून होणाऱ्या प्रचाराला मतदारांचा प्रतिसाद देखील मिळू शकतो. एकंदरच आगामी निवडणुकीत गोंधळ घालण्यासाठी तिसरी आघाडी सज्ज झाली आहे,असे सध्याचे चित्र आहे.

Bacchu Kadu, Shirish Kotwal & Ganesh Nimbalkar
Sujay Vikhe Vs Balasaheb Thorat : सुजय विखे थांबायला तयार नाय; थोरातांच्या घरासमोर जात..!

आमदार कडू यांनी नाशिक जिल्ह्यात गणेश निंबाळकर (चांदवड) आणि गुरुदेव कांदे (निफाड) असे दोन उमेदवार जाहीर केले. हे दोन्ही उमेदवार मर्यादित राजकीय ताकदीचे असल्याचे बोलले जाते. मात्र ते प्रहार पक्षाचे उमेदवार असल्याने त्यांचे उपद्रव मूल्य नक्कीच आहे. त्यामुळे निफाड आणि चांदवड दोन्ही विधानसभा मतदारसंघात प्रहार काय खेळ करणार? याची उत्सुकता आहे.

चांदवड- देवळा या विधानसभा मतदारसंघात प्रादेशिक विभागणी आहे. यामध्ये गेल्या तीन निवडणुकांमध्ये या प्रादेशिक विभागणीमुळे चांदवड तालुक्यात मतदानाची विभागणी होते. देवळा तालुक्यातील ८० ते ८५ टक्के मतदार एकाच उमेदवाराला मतदान करतात, असे दिसून आले आहे.

गेल्या तीन निवडणुकांमध्ये चांदवड तालुक्यातून काँग्रेस आणि अन्य एक उमेदवार असतो. त्यामध्ये मत विभागणी होते. त्यात पराभूत होणाऱ्या उमेदवाराला चांदवड मधून २० ते २५ हजार मते मिळतात. हा उमेदवार चांदवडच्या प्रमुख उमेदवाराच्या मतांमध्ये विभागणी करतो. त्यामुळे चांदवडच्या उमेदवाराचा पराभव होत आला आहे.

Bacchu Kadu, Shirish Kotwal & Ganesh Nimbalkar
Narhari Zirwal Politics: झिरवाळ यांचा यु टर्न; आता मुख्यमंत्री नव्हे, राज्यपाल होण्याची इच्छा!

प्रहार पक्षाने श्री निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. श्री निंबाळकर हे चांदवड तालुक्यातील पूर्व भागात सक्रिय असलेले कार्यकर्ते आहेत. त्यांचा पूर्व भागात संपर्क देखील आहे. त्या पलिकडे त्यांना किती प्रतिसाद मिळेल, हा चर्चेचा विषय आहे.

मात्र उर्वरित चांदवड तालुक्यात त्यांना कोणताही प्रतिसाद मिळण्याची चिन्हे नाहीत. देवळा तालुक्यात तर ते प्रभावहीन करण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे बच्चू कडू यांनी आपल्या नाशिकच्या दौऱ्यात चांदवड मतदार संघाचे गणित बिघडविण्यात महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यांचा प्रहार चांदवड विधानसभा मतदारसंघात काँग्रेसवर होणार हे मात्र नक्की.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com