Narhari Zirwal News: विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीतील अंतर्गत राजकारणावर विधान केले होते. आपण विनोदाने काही विधाने केल्याचा दावा त्यांनी केला होता. त्याबाबत त्यांनी आज यु टर्न केला.
नाशिक येथे धनगर समाजाला आदिवासी समाजातील आरक्षण देण्यावरून वाद निर्माण झाला होता. त्याबाबत विविध आदिवासी आमदारांनी आणि नेत्यांनी राज्य शासनावर नाराजी व्यक्त केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत विधान केले होते.
मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत केलेल्या विधानावर हे नेते नाराज झाले होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी आदिवासी लोकप्रतिनिधींची भूमिका देखील समजून घेतले पाहिजे. आदिवासींच्या भावना त्यांनी ओळखाव्यात असे त्यांनी सांगितले होते.
त्याचा आज श्री. झिरवाळ यांनी पुनरावच्चार केला. ते म्हणाले, येत्या 21 सप्टेंबरला मुख्यमंत्री आदिवासी आमदारांचे म्हणणे ऐकतील त्यासाठी बैठकीचे आयोजन केले आहे.
यावेळी पत्रकारांनी आपल्याला मुख्यमंत्री व्हायचे आहे, असे विधान नाशिक येथे केले होते. याचे स्मरण करून दिले. त्यावर पुन्हा एकदा नरहरी झिरवाळ यांनी आपण तसे विनोदाने म्हटलो होतो, असे सांगितले. आता आपल्याला मुख्यमंत्री नव्हे तर राज्यपाल होण्याची इच्छा आहे.
ते पुढे म्हणाले, किमान राज्यपाल झाल्यावर निवृत्त होता येते. राज्यपालांना निवृत्त होण्याची तरी सोय आहे. मात्र त्यांचे हे विधान गांभीर्याने घ्यावे की ते देखील विनोदानेच म्हटले आहे, असा प्रश्न अनेकांना पडला.
मुख्यमंत्री शिंदे यांनी धनगर समाजाबाबत आरक्षणाची घोषणा केली. त्यात धनगर आणि धनगड हा वादाचा विषय आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी असे निर्णय घाई गडबडीत घेऊ नये. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने देखील हे दोन्ही शब्द आणि जाती वेगळ्या आणि भिन्न आहेत, असे स्पष्ट केले आहे.
धनगर समाजाच्या नेत्यांची बाजू ऐकली तशीच आमची देखील बाजू ते सोमवारी ऐकणार आहेत. ही बाजू ऐकल्यावर सरकार आदिवासी समाजाच्या आरक्षणातून धनगर समाजाला आरक्षण देतील, असे अजिबात वाटत नाही. असेही श्री झिरवाळ म्हणाले.
आमदार अपात्रतेबाबत देखील श्री झिरवाळ यांनी आपण आमदारांना अपात्र करतो, असे कधीही म्हणालो नव्हतो. याबाबत चुकीची माहिती दिली जात आहे, असे सांगितले.
राज्यात धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जलसमाधी आंदोलन सुरू आहे. त्या संदर्भात नुकतेच धनगर समाजाचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाने राज्यात नवा वाद सुरू झाला आहे. याबाबत आदिवासी लोकप्रतिनिधी आक्रमक आहेत. हे लोकप्रतिनिधी मुख्यमंत्र्यांच्या भेटीत काय भूमिका घेतात, याविषयी सगळ्यांनाच उत्सुकता आहे.
------
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.