
DYSP Anant Kulkarni Jalna : जालना इथल्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा ताफा अडवल्याच्या रागातून पोलिस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी फिल्मी स्टाईलमध्ये जंप घेत आंदोलकाच्या कमरेत लाथ घातली. यावरून संतापाची लाट उसळली असतानाच, प्रहारचे बच्चू कडू यांनी भाजप मंत्री पंकजा मुंडे यांच्या 'समजपणा'वरच हल्ला चढवला आहे.
तसंच 'DYSP' अनंत कुलकर्णी यांच्या ढुंगणावर लाथ कशी बसवायची, याबाबत सूचक, असा इशारा दिला आहे. बच्चू कडू यांच्या या प्रतिक्रियेनंतर त्या 'DYSP'चं काही खरं नाही, अशी चर्चा आहे.
बच्चू कडू (Bachchu Kadu) म्हणाले, "त्याला देखील लाथ मारली पाहिजे. त्या 'DYSP'च्या ढुंगणावर पोस्टर कसं लावायचं ते आम्ही पाहू. अशा प्रकारची मस्ती असेल तर गंभीर्यानं दखल घेऊ". मंत्री आली की, तुम्ही मतदाराला लाथ मारणार, निवडणूक आली की, त्याच्या घरापर्यंत जाणार, ते पंकजाताईंना देखील समजायला पाहिजे, असा टोला बच्चू कडू यांनी लगावला.
बच्चू कडू यांनी भाजप (BJP) मंत्री पंकजा मुंडे यांच्या समजपणावर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, "पंकजाताईंना समजायला पाहिजे. पंकजाताईंनी निषेध केला पाहिजे. मंत्र्यांच्या दौऱ्यात असे होत असेल, तर गंभीर आहे. अन् त्यांच्या दौऱ्यात असे होत असेल, तर पंकजाताईंना समजायला पाहिजे".
बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील सुनावलं आहे. 'जगपातळीवरचे तज्ज्ञ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहविभागाचा कारभार आहे. त्यांचा पोलिस असा वागत असेल, तर त्यांनी याची दखल घेतली पाहिजे. अशाचं निलंबनाचं काही होत नाही. त्या शेतकऱ्याकडून त्याच्या ढुंगणावर लाथ मारली पाहिजे', असा घणाघात बच्चू कडू यांनी केला.
दरम्यान, DYSP अनंत कुलकर्णी या घटनेवर स्पष्टीकरण दिलं आहे. जालन्यात आत्मदहन करण्याचा प्रयत्न करताना आंदोलनकर्त्याने महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर रॉकेल टाकले. त्यामुळे बळाचा वापर केला. पत्नीने दुसरं लग्न केल्यानं पत्नीला आणून देण्याच्या मागणीसाठी गोपाल चौधरी हे मागच्या काही दिवसांपासून जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत. यावेळी पोलिसांनी त्यांची अनेकवेळा समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तरी देखील मंत्री पंकजा मुंडे यांच्या दौऱ्यात आत्मदहनाचा प्रयत्न केला, असे स्पष्टीकरण अनंत कुलकर्णी यांनी दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.