Gulabrao Patil Thecha Bhakri : बच्चू कडू घरी येणार म्हणून, गुलाबरावांनी ठेचा अन् गरमागरम भाकरी बनवली; पण...

Prahar Janshakti Party Bachchu Kadu Visit Shiv Sena Minister Gulabrao Patil Made Thecha & Bhakri in Jalgaon : शिवसेनेचे जळगावमधील मंत्री गुलाबराव पाटील यांनी बच्चू कडू यांच्यासाठी घरी ठेचा अन् भाकरी, असा जेवणाचा बेत ठेवला होता.
Gulabrao Patil Thecha Bhakri
Gulabrao Patil Thecha BhakriSarkarnama
Published on
Updated on

Bachchu Kadu Gulabrao Patil meeting : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्यात यात्रा सुरू केलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू आणि शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या राजकीय संघर्ष पेटला आहे. बच्चू कडू यांनी थेट गुलाबराव पाटील यांच्या घरावर चालून जाण्याची भाषा केली होती. गुलाबराव पाटलांनी देखील जशास-तसं उत्तर दिलं जाईल, असा इशारा दिला.

बच्चू कडू गावाच्या वेशीवर आल्याचे कळाल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी ते घरी येतील म्हणून, ठेचा अन् गरमागरम भाकरीचा बेत आखला होता. पण, बच्चू कडू वेशीवरून मागे परतले. त्यामुळे मंत्री पाटलांचा हा बेत फसला.

शिवसेना मंत्री गुलाबराव पाटलांची (Gulabrao Patil) भेट न घेताच मागे फिरलेले बच्चू कडू म्हणाले, आता मी गावाच्या वेशीपर्यंत आलो आहे, कर्जमाफी झाल्यानंतर मी गुलाबराव पाटलांची भेट घेण्यासाठी पुन्हा येईल, असं म्हटलं आहे. यावर मंत्री गुलाबराव पाटलांनी देखील त्यांच्या शैलीत प्रत्युत्तर दिलं. त्यांचं हे प्रत्युत्तर चांगलच चर्चेत आलं आहे.

ते म्हणाले, "बच्चू कडू माझे मित्र, ते येणार म्हणून मी गरमागरम भाकरी अन् खानदेशी पद्धतीचा ठेचा पाहुणचाराची तयारी केली होती."शेतकऱ्यांच्या (Farmer) कर्जमाफीचा निर्णय राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. विरोधक म्हणून सरकारवर टिका करणे त्यांचे कामच आहे, असे सांगताना मंत्री गुलाबरावांनी गरमागरम भाकरी आणि ठेच्याचे ताटच दाखवले.

Gulabrao Patil Thecha Bhakri
Devendra Fadnavis assures Vivek Kolhe : राजकीय पुनर्वसनाचं विसरलो नाहीत, पण फडणवीसांनी मुहूर्तही नाही सांगितला! विवेक कोल्हेंचं टेन्शन वाढलं!

गुलाबराव पाटील यांची भेट न घेताच बच्चू कडू पाळधी गावाच्या वेशीवरून परतले आहेत. चाळीसगाव इथल्या कार्यक्रमाला जायचे असल्याने आता गावाच्या वेशीवरूनच परत जातो आहे. मात्र कर्जमाफीचा निर्णय झाल्यानंतर गुलाबराव पाटील यांची भेट घेण्यासाठी पुन्हा येणार असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले.

Gulabrao Patil Thecha Bhakri
Prakash Ambedkar News : धनगर समाजाच्या अधिवेशनात गेलेल्या प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान; थेटच बोलले, ओबीसींनी 'त्यांना' मतदान करू नये...

बच्चू कडू जळगाव इथं शेतकऱ्यांच्या जन आक्रोश मोर्चाला उपस्थित झाले होते. तेव्हापासून गुलाबराव पाटील अन् बच्चू कडू यांच्यातील राजकीय संघर्षाला सुरूवात झाली आहे. शेतकऱ्यांसाठी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या गावात मोर्चा घेऊन जाईल, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला होता. त्यावर गुलाबराव पाटील यांनी गावात येऊन दाखवा, असे आव्हान दिले होते. यानंतर गुलाबराव पाटलांनी काहीशी नरमाईची भूमिका घेत, जर बच्चू कडू गावात आले, तर त्यांच्यासाठी खास खानदेशी पद्धतीचा पाहुणचार करेल, असे विधान केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com