
Vivek Kolhe political rehabilitation : कोपरगावमधील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या देशातील पहिल्या सीएनजी प्रकल्पाचं उद्घाटना केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते झालं. कोपरगावमध्ये अमित शहा यांचा दौरानिश्चित झाल्यापासून एकच चर्चा होती, ती म्हणजे, भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांच्या राजकीय पुनर्वसनाची!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर जाहीरपणे भाष्य केले. परंतु मुहूर्त कधी? याची आता कोपरगावकरांना उत्सुकता आहे. अमित शहा यांनी मात्र विवेक कोल्हेंसाठी वेगळाच पॅटर्न तयार ठेवला असल्याची देखील चर्चा भाजपच्या, मुख्यमंत्र्यांच्या गोटातील प्रमुखांमध्ये रंगली आहे.
विवेक कोल्हे यांच्या राजकीय पुनर्वसनावर बोलताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी सूचक विधान केलं. विशेष म्हणजे, यावेळी त्यांचे शिलेदार आमदार आशुतोष काळे व्यासपीठावर होते. अजित पवार यांनी, 'जे तुमच्या मनात आहे, तेच अमितभाईंच्या मनात आहे', एवढं इथं सांगतो. यापेक्षा मी जास्त काही बोलत नाही, असे सांगितले.
अजित पवार यांनी महायुतीशी प्रामाणिक राहिल्याने संजीवनी ग्रुपचे आभार मानले. यानंतर हाच धागा पकडत भाजप (BJP) नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विवेक कोल्हे यांच्या राजकीय पुनर्वसनावर मोठं भाष्य केले. कोपरगावमध्ये महायुतीमधील पेच कसा सोडवला, याची आठवण करून देताना कोल्हे यांच्या राजकीय पुनर्वसन करायचे विसरलो नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, "विधानसभा निवडणुकीवेळी महायुती होती. महायुतीमध्ये कोपरगावमध्ये आशुतोष काळे हे उमेदवार होते. अशा परिस्थितीमध्ये स्नेहलताताईंना, विवेक भैय्यांना आणि बिपीनदादांना महायुती असल्याने तुम्ही निवडणुका लढू नका. आपण आता सगळे एनसीपीचे उमेदवार आहेत, त्या आशुतोष काळे साहेबांना मदत करू आणि त्यांनी ती मदत केली."
'कोल्हे परिवार अन् संजीवनी ग्रुपने ती मदत मोठ्या मनानं केली. त्यामुळे आज आपली महायुती इथं भक्कम उभी आहे. पण त्याचवेळी आम्हाला याचीही कल्पना आहे की, आम्ही स्नेहलताताईंना आणि विवेकभैय्यांना सांगितलं होतं की तुमचं जे काही राजकीय भवितव्य आहे, त्याची काळजी अमितभाई आणि आम्ही घेऊ. हे आम्ही विसरलेलो नाही आणि अमितभाई पण विसरलेले नाही,' याचा पुनः उच्चार देवेंद्र फडणवीस यांनी केला.
'अमितभाईंनी गाडीमध्ये बसलो असताना, त्यांनी उल्लेख केला की, विवेकभैय्या आणि स्नेहलताताई आपल्याला भेटायला आले होते. आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे करायचे आहे. त्यामुळे त्याची काळजी करू नका, तुमचं सगळं राजकीय भविष्य उत्तम होईल. पण आता एक उत्तम काम तुम्ही केलेलं आहे, हे काम अजून मोठा कसं करता येईल, हे काम इतरांनाही कसं करता येईल, याचा प्रयत्न करा,' असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हेंना दिला.
विवेक कोल्हे यांच्या राजकीय पुनर्वसनाची आठवण अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी कोपरगावमध्ये येऊन काढली. काळजी करू नका, सगळं काही लक्षात आहे, विसरलो नाहीत, असं सांगून आता ही नेते मंडळी पुढच्या राजकीय दौऱ्याला निघून गेले. परंतु विवेक कोल्हे यांच्या राजकीय पुनर्वसनाचा मुहूर्त कधी, यांचं उत्तर मिळालं नाही. पण काळ हेच सर्वांवर औषध असंत, त्याचप्रमाणे कोल्हेंना वाट पाहावी लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.