Nashik IVF Center Raid : बदलापूर स्त्री-बीज तस्करीचे धागेदोरे नाशिकपर्यंत? मुंबई नाका परिसरातील IVF सेंटरवर महापालिकेची धाड

Badlapur Uterine Eggs Selling Racket Nashik Connection : बदलापूरमधील कथित स्त्री बीज तस्करी प्रकरणाचे लोण आता नाशिकपर्यंत पोहोचले असून महापालिकेने एका सेंटर'वर धाड टाकून कागदपत्रे जप्त केली आहेत.
Nashik IVF Center Raid
Nashik IVF Center RaidSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : ठाण्यातील बदलापूरमधील कथित स्त्री बीज विक्री प्रकरणातील धागेदोरे आता नाशिकपर्यंत पोहोचले आहे. बदलापूरमधील रॅकेटच्या तपास करत असताना नाशिकच्या मुंबई नाका परिसरातील एका नामांकित आयव्हीएफ केंद्राबाबतचे काही पुरावे पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती असून महापालिकेच्या आरोग्य विभागाने मुंबई नाका परिसरातील 'मालती आयव्हीएफ सेंटर'वर छापा टाकून कसून तपासणी केली असून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

ठाण्यातील बदलापूरात स्त्री बीज विक्रीचे अवैध रॅकेट समोर आलं आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच गरजू महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या शरीरातून बेकायदेशीरपणे स्त्री-बीजे काढली जात होती. एका पीडित महिलेला ठरलेला मोबदला न मिळाल्याने तीने पोलिसांकडे तक्रार केली आणि या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला. कायदेशीर रित्या एका महिलेकडून एकदाच स्त्री बीज काढण्यात येते, मात्र एकाच महिलेकडून वारंवार स्त्री बीज घेतल्यास ते बेकायदेशीर तर आहेच पण धोकादायक देखील आहे.

या स्त्री बीज देणाऱ्या महिलांना किती पैसे दिले जायचे हे देखील समोर आले असून एका महिलेला 18 ते 25 हजार रुपये या स्त्री बीज विक्रीतून मिळायचे, हेच बीज पुढे नामांकित सेंटर्सना लाखो रुपयांच्या किमतीत विकले जात होते अशी माहिती सूत्रांनी दिली.

Nashik IVF Center Raid
Nashik NMC : प्रशासकीय काळातील चार वर्षांच्या कारभाराची फाईल उघडा ! सत्तेच्या खुर्चीत बसताच शिवसेना आक्रमक मोडमध्ये

बदलापूरमधील छाप्यादरम्यान पोलिसांना नाशिकच्या 'मालती आयव्हीएफ सेंटर'चे प्रमाणपत्र आणि काही कागदपत्रे सापडली होती. त्याआधारावर महापालिकेच्या पथकाने मुंबई नाका येथील सेंटरवर धाड टाकून महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. नाशिक विभागाच्या आरोग्य उपसंचालकांनी सखोल चौकशीचे आदेश दिले असून बदलापूर येथे सापडलेल्या कागदपत्रांशी या सेंटरचा काय संबंध आहे? याचा खुलासा करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे.

कायद्यानुसार एखादी महिला आपल्या आयुष्यात फक्त एकदाच स्त्री-बीज दान करू शकते. मात्र, उघडकीस आलेल्या या रॅकेटमध्ये बनावट आधार कार्डे आणि खोटी प्रतिज्ञापत्रे तयार करून एकाच महिलेकडून अनेक वेळा बीज काढल्याचे समोर आले आहे. काही प्रकरणांत तर एका महिलेकडून ३० पेक्षा अधिक वेळा बीज संकलन करण्यात आल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे. या धोकादायक प्रक्रियेमुळे सुमारे ३०० हून अधिक महिलांचे शारीरिक शोषण झाले असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे.

Nashik IVF Center Raid
Devendra Fadnavis : "तुमची क्षमा मागतो, तुम्ही माझी गाडी अडवू शकला नाही;" फडणवीस नाशिकमधून जाता जाता नेमकं काय म्हणाले?

या संपूर्ण प्रकरणाचा आवाका मोठा असून मुंबई, ठाणे आणि नाशिकमधील काही नामांकित आयव्हीएफ केंद्रेही पोलिसांच्या तपासाच्या कक्षेत आली आहेत. या रॅकेटमागील मुख्य सूत्रधार नेमके कोण आहेत आणि नाशिकमधील संबंधित केंद्राची भूमिका काय होती, किंवा नेमका सहभाग किती याचा सखोल तपास सध्या पोलीस करत आहेत.

राज्य महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतली असून बदलापुरातील स्त्री बीज तस्करी प्रकरणात सहभाग असलेल्या IVF सेंटरवर तसच सोनोग्राफी सेंटरवर कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी दिली आहे. नाशिकमधील परवानगी असलेले मालती आयव्हीएफ सेंटर हे ठाण्यात बेकायदेशीर रित्या सुरु होतं. याच सेंटरच्या माध्यमातून स्त्री बीज तस्करीचे रॅकेट चालवले जात असल्याचे रुपाली चाकणकर यांनी सांगितले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com