Badlapur Rape Case : संवेदनशील घटनेच्या निषेध आंदोलनातही एकी नाही

Badlapur Rape Case Protest in Shrirampur : बदलापूर अत्याचार घटनेच्या निषेधासाठी महाविकास आघाडीने राज्यात काल रस्त्यावर उतरली होती. श्रीरामपूरमध्ये मात्र निषेध आंदोलनात देखील काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्षात गटबाजी उफाळलेली दिसली.
Shrirampur
ShrirampurSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : बदलापूर अत्याचार घटनेच्या निषेधासाठी महाविकास आघाडीतील पक्षांची वेगवेगळी झाली. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्षातील गटांनी प्रत्येकी दोन वेगवेगळी आंदोलन केली. यामुळे पक्षांतर्गत असलेला कलह, अशा संवेदनशील घटनेत आंदोलन करताना देखील चव्हाट्यावर आला.

श्रीरामपूरमधील विधानसभा मतदारसंघात गांधी पुतळ्यासमोर शिवसेना (Shiv Sena) ठाकरे पक्षाचे माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे आणि तालुकाप्रमुख लखन भगत नेतृत्वाखाली निषेध आंदोलन झाले. याच ठिकाणी काँग्रेसचे आमदार लहू कानडे यांनी हजेरी लावली. शिवसेनेच्यावतीने सुरू असलेल्या आंदोलनापासून त्यांनी अवघ्या काही अंतरावर तंबू टाकला होता. तसेच काँग्रेसच्या करण ससाणे गटाने पालिकेसमोर, तर शिवसेना ठाकरे पक्षाच्या दुसऱ्या गटाने पालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आत्मक्लेष आंदोलन केले.

Shrirampur
Balasaheb Thorat News : 'राज्यात महिला सुरक्षित नाहीत, तरीही सत्ताधारी..' ; बाळासाहेब थोरातांचा महायुती सरकारवर निशाणा!

आमदार लहू कानडे यांच्या नेतृत्वाखाली येथील महात्मा गांधी पुतळ्यासमोर काळ्याफिती लावून निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी श्रद्धा गोरे या विद्यार्थिनीने आवेशपूर्ण भाषण केले. अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशी द्या, गृहमंत्री राजीनामा द्या, या सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय तसेच राज्यातील महायुती सरकारचा निषेध असो, या घोषणांनी परिसर यावेळी दुमदुमला होता.

Shrirampur
Ahmednagar Teacher : प्राथमिक शिक्षकांच्या 15 संघटना एकवटल्या; 'सीईओ'विरोधात मोर्चा

नगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक करण ससाणे, काँग्रेसचे (Congress) प्रदेश सरचिटणीस हेमंत ओगले यांच्या नेतृत्वाखाली पालिकेसमोर काळ्याफिती लावून निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी संजय फंड, रितेश रोटे, अण्णासाहेब डावखर, मुरलीधर राऊत यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

ठाकरे शिवसैनिकांची दोन वेगवेगळी आंदोलन

शिवसेना ठाकरे पक्षाच्या गांधी चौकातील आंदोलनावेळी तालुकाप्रमुख लखन भगत, काँग्रेसचे सचिन गुजर, ज्ञानेश्वर मुरकुटे, भगवान उपाध्ये यांच्यासह व्यापारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना ठाकरे पक्षाच्या दुसऱ्या गटाच्यावतीने पालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमोर पुतळ्यासमोर आत्मक्लेष आंदोलन केले.

राज्यातून 23 हजार मुली बेपत्ता

एक जुलैपासून आत्तापर्यंत राज्यातून 23 हजार मुली बेपत्ता झाल्या आहेत. यापैकी केवळ 111 प्रकरणांचा छडा लागला आहे. बदलापूर घटनेत प्रशासनाचा आणि सरकारच्या निष्काळजीपणाचा आम्ही निषेध करतो. गृहमंत्री निवडणुका आणि त्यांच्या कमिशनखोरीमध्ये अडकलेले असून देवेंद्र फडणवीस यांनीगृहमंत्र्यांनी पदाचा राजीनामा द्यावा. या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी तसेच शाळा व्यवस्थापनावर कठोर कारवाई करण्याची मागणी आमदार लहू कानडे यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com