Balasaheb Thorat Vs Ajit Pawar : काँग्रेसचे आमदार अजितदादांच्या संपर्कात; बाळासाहेब दादांना म्हटले, 'सगळं गृहीत धरू नका'

Balasaheb Thorat reaction to the issue of Congress MLAs being in touch with NCP : काँग्रेसचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असलेल्या मुद्यावर बाळासाहेब थोरातांचा अजित पवारांना सूचक असा इशारा दिला.
Balasaheb Thorat Vs Ajit Pawar
Balasaheb Thorat Vs Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला काँग्रेस झटका देण्याच्या तयारीत आहे. काँगेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी तसा सूचक इशारा दिला आहे.

'अजित पवार यांच्या संपर्कात असलेली जी नावं जाहीर झाली आहे, ती सगळी गृहीत धरू नका. जसे त्यांचे सर्व्हे आहे, तसे आमचे देखील आहेत, एवढं लक्षात घ्या', असा सांगत बाळासाहेब थोरात यांनी आगामी काळात काँग्रेस राष्ट्रवादीला झटका देणार, असे संकेत दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांची राज्यात जन सन्मान रॅली सुरू आहे. अजित पवार यांनी नुकताच महायुतीत 54 जागांवर दावा केला. तसंच काँग्रेसमधून संपर्कात असलेल्या आमदारांचा जागांवर देखील दावा ठोकला. काँग्रेसमधील चार ते पाच आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जाते. हिरामण खोसकर, सुलभा खोडके आणि झिशान सिद्दिकी यांच्यासह काही काँग्रेस आमदारांची नावे चर्चेत आहेत. यावर बाळासाहेब थोरातांनी अजित पवारांना सूचक, असा इशारा दिला.

Balasaheb Thorat Vs Ajit Pawar
Eknath Shinde Vs Prajakt Tanpure : मुख्यमंत्र्यांना लाज कशी वाटत नाही; आमदार तनपुरे का भडकले?

बाळासाहेब थोरात म्हणाले, "राष्ट्रवादी अजित पवार यांच्या संपर्कात कोण आहे, याची आम्हाला पूर्ण माहिती आहे. पण जी नावे घेत आहात, किंवा इतरांची नावं चर्चेत आहे, ती सगळी अजितदादांनी गृहीत धरू नये. परंतु नाव असलेली सगळेच संपर्कात आहेत, असे समजण्याचे काहीच कारण नाही. त्याचा काही फरक काँग्रेसला (Congress) पडणार नाही". अजितदादांच्या संपर्कात असलेल्या सर्वांची रिपोर्ट कार्ड आमच्याकडे देखील आहेत. परंतु योग्य वेळी निर्णय घेणार आहोत, असे देखील बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.

Balasaheb Thorat Vs Ajit Pawar
Rohit Pawar : रोहित पवारांना आठवले 'माफीवीरांचे' कारनामे; मग काय संस्कारसह सर्वच काढलं...

तिजोरीची चावी त्यांच्याच हातात दिली

महायुती भाजप सरकारच्या भ्रष्टाचाराने छत्रपतींना देखील सोडले नाही. अजित पवारांविषयी जनतेमध्ये रोष होता. त्यांच्याविषयी भाजपवाले चक्की पीसिंग... चक्की पीसिंग... म्हणत होते. 70 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केले होते. त्यांच्याविषयी शहानिशा, चौकशी, खरं-खोट केलं नाही. उलट सत्तेत स्थान दिले. त्यांच्याच हातात राज्याच्या तिजोरीची चावी दिली. सत्तेसाठी काहीपण हा भाजपचा चेहरा जनतेसमोर उघडा पडल्याचा टोला बाळासाहेब थोरात यांनी लगावला.

महायुतीतील संघर्ष पाहण्यासारखा असणार

महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाबाबत कोठेही गटबाजी नाही. मागणी, आग्रह आणि पुढे एकमत, असा मविआचं ठरलेलं आहे. परंतु वाद आणि संघर्ष काय असतो, ते महायुतीत बघा. एकामेकांविरोधात बोलायला सुरवात झाली. काहींना तर एकमेकांचे नाव घेतल्यास ओकाऱ्या येतात. त्यांच्यातील संघर्ष पाहण्यासारखा राहील, असा खिल्ली देखील बाळासाहेब थोरातांनी उडवली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com