Eknath Shinde Vs Prajakt Tanpure : मुख्यमंत्र्यांना लाज कशी वाटत नाही; आमदार तनपुरे का भडकले?

Prajakta Tanpur criticism of Eknath Shinde reaction : सिंधुदुर्ग इथं छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळण्याच्या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे संतापले.
Prajakt Tanpur
Prajakt TanpurSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सिंधुदुर्गमधील पुतळा कोसळण्याच्या घटनेचा निषेधासाठी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. आमदार तनपुरे यांनी महायुती सरकारवर यावेळी जोरदार हल्ला चढवला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कशी लाज वाटत नाही, त्यांनी पहिल्यांदा राजीनामा दिला पाहिजे, असा खणखणीत टोला आमदार तनपुरेंनी लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळण्याच्या घटनेच्या निषेधासाठी लाक्षणिक उपोषण केले. राहुरी बाजार समिती समोर आमदार तनपुरे यांच्यासह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते. महायुती भाजप (BJP) सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा या वेळी निषेध करण्यात आले. समितीचे सभापती अरुण तनपुरे, बाबासाहेब भिटे, शेतकरी संघटनेचे रवींद्र मोरे आदी उपस्थित होते.

Prajakt Tanpur
Ganesh Naik: मुख्यमंत्री शिंदे अन् भाजप आमदारामध्ये संघर्ष पेटला!

आमदार प्राजक्त तनपुरे यांनी महायुती भाजप सरकारवर सडकून टीका केली. आमदार तनपुरे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याचा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात काळा दिवस ठरला आहे. शिल्पकार आणि कंत्राटदार यांच्यावर गुन्हे दाखल होऊन नाही. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राजीनामा द्यावा. भ्रष्टाचार कितपर्यंत पोचला आहे, याचे हे उदाहरण असून, या घटनेमुळे महाराष्ट्राची मान शरमेने झुकली आहे, असे देखील प्राजक्त तनपुरे यांनी म्हटले.

Prajakt Tanpur
Manoj Jarange News: जरांगे पाटलांंचा 'मास्टर प्लॅन' ठरला; बीड जिल्ह्यातल्या सहा मतदारसंघात करेक्ट कार्यक्रम करणार?

नोकरशाहीत भ्रष्टाचार हा शिष्टाचार

आठ महिन्यापूर्वी उभारलेला पुतळा कोसळतोच कसा? नोकरशाहीत भ्रष्टाचार हा शिष्टाचार झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून राजीनामा देण्याऐवजी सावरासावर करत आहेत. वाऱ्याच्या वेगाने पुतळा पडला, असे म्हणताना मुख्यमंत्र्यांना लाज कशी वाटली नाही, असा संताप आमदार तनपुरे यांनी व्यक्त केला. देशातील सागरकिनारी अनेक पुतळे आहेत, ते पुतळे अनेक वर्षांपासून उभे आहेत. मग महाराजांचा पुतळा कसा काय कोसळला, असा सवाल देखील आमदार तनपुरे यांनी व्यक्त केला.

शिल्पकारांची निवड करणाऱ्यांवर देखील गुन्हे नोंदवा

कंत्राटदार आणि शिल्पकारांची निवड करणाऱ्यांवर देखील गुन्हे दाखल करण्याची मागणी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली. सरकारला माफी मागून चालणार नाही. कामासाठी कंत्राटदार कोणी निवडले, त्यांची जबाबदारी कोणावर होती, शिल्पकाराचा अनुभव, शिल्पासाठी किती खर्च झाला, हा सर्व प्रश्नांची उत्तर जनतेसमोर मांडण्याची हिंमत महायुती भाजप सरकारने करावी, अशी मागणी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com