महाराष्ट्रातील वाळू धोरण आणि तलाठी भरती गैरप्रकारावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार बाळासाहेब थोरात यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर निशाणा साधला आहे. 'महाराष्ट्रातील वाळू धोरण फसलेले असून तलाठी भरती प्रक्रियेत वाळूमाफिया हे सरकारी संरक्षणात फिरत होते', असा गंभीर आरोप आमदार थोरात यांनी केला आहे.
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe Patil) यांनी राज्यात नवीन वाळू धोरण आणण्याबरोबरच तलाठी भरती प्रक्रिया (Talathi Bharti) राबवली. या दोन्हींमध्ये गैरव्यवहार (Scam) झाल्याचे अनेक आरोप झाले. या आरोपांना प्रत्युत्तराखातर मंत्री विखे यांनी आरोप करणाऱ्या विरोधकांवर कायदेशीर कारवाई करण्याची भाषा सुरू केली. या सर्व प्रकारावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी गंभीर शब्दांत टिप्पणी केली आहे.
आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले, 'महसूल मंत्र्यांचं नवीन वाळू धोरण (New Sand Policy) पूर्णपणे फसलेला आहे. ते त्यांनी सभागृहात देखील कबूल केले आहे. यानंतर नवीन कोणतेच धोरण आखून सुधारणा केलेली नाही. यातून वाळू चोरी वाढली आहे. आता यातून वाळूमाफिया आणि गुंडगिरी वाढलेली आहे. या गुंडगिरीला आता सरकारी संरक्षण मिळत आहे. याशिवाय फसलेल्या नवीन वाळू धरणातून सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल देखील बुडाला आहे'.
'मी महसूल मंत्री असताना राज्य सरकारला वाळूतून 2,200 कोटी रुपयांचा महसूल मिळायचा. आता परिस्थिती वेगळी आहे. आता या नवीन धोरणामुळे सरकारलाच तिजोरीतून पैसे देण्याची वेळ आली आहे. यातून गुंडगिरी वाढलेली आहे गरिबाला वाळू आता पहिल्यापेक्षा जास्त दराने खरेदी करावा लागत असल्याचा आरोप आमदार बाळासाहेब थोरात यांनी केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
तसेच आमदार बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकारच्या तलाठी भरती प्रक्रियेत प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप देखील केला. आमदार थोरात म्हणाले, 'तलाठी भरती प्रक्रियेत प्रचंड भ्रष्टाचार झाला, गोंधळ झाला. यातून प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. काही ठिकाणी वाळूमाफिया हे तलाठी भरती प्रक्रिया सुरू असताना फिरताना आढळले. धक्कादायक म्हणजे ते सर्व सरकारी संरक्षणात फिरत होते'.
यातून विरोध करणाऱ्या आणि खरी वस्तुस्थिती निदर्शनास आणून देणाऱ्याविरुद्ध कायद्याचा धाक निर्माण केला जातोय. खोट्या केसेस दाखल केल्या जात आहेत. खोट्या केसेसचा कार्यक्रम सगळीकडे सुरू आहे. सत्तेचा गैरवापर यातून दिसतोय. हे जनता सर्व पाहत आहे. सहन करत आहे. परंतु निवडणुकीमध्ये जनता या सगळ्यांना जोरदार उत्तर देणार आहे, असेही आमदार थोरात यांनी म्हटले.
(Edited by Avinash Chandane)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.