Balasheb Thorat : बाळासाहेब शोधताहेत 'पूर्वी'च्या राज ठाकरेंना!

Political News: महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजपशी युती करणार यावर आमदार थोरात यांनी मांडली भूमिका
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Nagar News : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेवर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. "आम्ही पूर्वीचे राज ठाकरे यांना शोधत आहोत. ते भेटल्यास आनंद होईल," अशा उपरोधात्मक शब्दांत बाळासाहेब थोरात यांनी राज ठाकरे यांच्या बदलत्या भूमिकेवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे भाजपशी युती करणार असल्याच्या चर्चा होत आहेत. तसे मनसेचे नेते हे भाजपच्या नेत्यांशी गाठीभेटी घेत आहेत. यात प्रामुख्याने भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मनसेच्या नेत्यांच्या चर्चा सुरू आहेत. या चर्चा भाजप मनसेच्या युतीच्या असल्याच्या सांगितल्या जात आहेत. यातच मनसे राज्यातील काही विषयांवर परखड भूमिका मांडत आहेत.

Raj Thackeray
Abhishek Ghosalakar: अभिषेक घोसाळकरांचे प्लॅनिंग ठरलं होतं, पत्नी मुलांसह जाणार होते; पण...

मनसेची पहिल्यापासून मराठी माणसाविषयी भूमिका राहिली आहे. त्यामुळे भाजपला मनसेच्या माध्यमातून मराठी माणूस आपल्याकडे आकर्षित करायचा आहे. यासाठी भाजप हा मनसेबरोबर युती करणार असल्याचे सध्यातरी राजकीय चर्चा आहे. यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी राज ठाकरेंच्या शैलीत उपरोधात्मक पद्धतीने मत मांडले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार बाळासाहेब थोरात (Balasheb thorat) म्हणाले, "मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे अतिशय चांगले नेते आहेत. महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने ते नेहमी भूमिका मांडत असतात, परंतु अलीकडच्या काळात त्यांच्या भूमिका कशा राहिल्या आहेत, हे आपण जाणून आहोत." ठाम आणि परखड भूमिका मांडणाऱ्या राज ठाकरेंना आम्ही ओळखतो. ते अलीकडे त्यांच्यात सापडत नाहीत. एक प्रकारे पूर्वीचे राज ठाकरे सापडत नाहीत. ते जर सापडले तर सर्वाधिक आनंद आम्हाला होईल, असेही आमदार थोरात म्हणाले.

(Edited By - Sachin Waghmare)

R

Raj Thackeray
Balasaheb Thorat : खरं सांगतो...! ‘त्या’ वेळेस परीक्षेपेक्षा जास्त टेन्शन असतं, असं का म्हणाले बाळासाहेब थोरात?

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com