Balasaheb Thorat News : प्रवरा नदीतील घटनेवरून विखे पाटलांना सुनावले; बाळासाहेब थोरात नेमके काय म्हणाले?

Radhakrishna Vikhe Patil and SDRF Team : बुडालेल्या तरुणाचा शोध घेताना एसडीआरएफ पथकाचीच बोट उलटली. बोट उलटल्याने पथकातील तीन जवानांचा मृत्यू झाला.
Balasaheb Thorat
Balasaheb ThoratSarkarnama

Ahmednagar Political News : नगरमधील अकोले तालुक्यातील सुगाव गावाजवळील प्रवरा नदीत दोन तरुण बुडाले होते. त्यातील एकाच्या शोधासाठी आलेल्या एसडीआरएफ पथकाची बोट उलटली. या अपघातात एसडीआरएफ पथकातील तीन जवानांचा मृत्यू झाला. या गंभीर घटनेकडे जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या राधाकृष्ण विखे पाटलांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी केला आहे. यावरून विखे-पाटील असा वाद पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. Balasaheb Thorat News

प्रवरा नदीत बुधवारी (ता. 22) दोन तरुण बुडाले होते. त्यातील एकाचा मृतदेह सापडला तर दुसऱ्याच्या शोधासाठी एसडीआरएफ पथकाला पाचारण करण्यात आले. बुडालेल्या तरुणाचा शोध घेताना एसडीआरएफ पथकाचीच बोट उलटली. बोट उलटल्याने पथकातील तीन जवानांचा मृत्यू झाला. तर पथकातील इतर दोघांचा प्रशासनाच्या वतीने शोध घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे प्रांताधिकारी शैलेश कुमार हिंगे यांनी माहिती दिली. याबाबत माहिती मिळताच माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat घटनास्थळी दाखल झाले होते.

प्रवरा नदीत घडलेल्या दोन्ही घटनांबाबत जिल्ह्यातील सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार Rohit Pawar यांनी मृत्यू झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. मात्र पालकमंत्री विखे पाटलांनी दखल घेतली नसल्याचा आरोप बाळासाहेब थोरातांनी केला आहे. नगर येथे घडलेल्या दुर्घटनेत देखील प्रशासन आणि पालकमंत्री म्हणून कोणाचेही लक्ष नसल्याचे आम्हाला दिसून आले आहे, असा आरोप थोरातांनी केला आहे. याला विखे पाटील काय उत्तर देणार, याकडे नगरचे लक्ष आहे.

राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!

Balasaheb Thorat
Who Is Dhangekar : चंद्रकांतदादांना दूध पोळले होते; सामंतांनी ताक फुंकून प्यायला हवे होते...

थोरात म्हणाले, दुष्काळाच्या परिस्थितीला आचारसंहितेचा बंधन नसते. निवडणूक प्रक्रिया सुरू असली तरी जनतेकडे लक्ष देणे ही मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे. एक दिवस पाण्याचा टँकर गेला नाही, तर तेथील वाड्याचे, गावाचे काय अवस्था असेल याचा विचार सरकारने करावा. निवडणूक संपली म्हणून बैठक घेतली ही औपचारिकता झाली, मात्र सरकार म्हणून दुष्काळाकडे संपूर्णपणे दुर्लक्ष झालेले आहे. बैठकीला पालकमंत्री उपस्थित राहणे गरजेचे होते. मात्र सर्व पालकमंत्री विदेशात फिरायला गेले आहेत. अहमदनगर येथे घडलेल्या दुर्घटनेतही प्रशासन आणि पालकमंत्री म्हणून कोणाचेही लक्ष नसल्याचे दिसून आले.

(Edited by Sunil Dhumal)

Balasaheb Thorat
Gajanan Kirtikar News : शिंदेंची डोकेदुखी वाढली; शिलेदारांमध्ये जुंपली; कीर्तिकरांमुळे महायुतीतील वातावरण तापले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com