Who Is Dhangekar : चंद्रकांतदादांना दूध पोळले होते; सामंतांनी ताक फुंकून प्यायला हवे होते...

Uday Samant On Pune Hit And Rune Case : पुणे 'हिट अँड रन' प्रकरणानंतर उद्भवलेल्या एका वादात उद्योगमंत्री सामंत यांनी 'धंगेकर कोण आहेत'? असा प्रतिप्रश्न पत्रकारांना केला. धंगेकर यांनी पोलिसांचे आणखी गैरव्यवहार उघडकीस आणायला सुरवात केली आहे.
Uday Samant, Ravindra Dhangekar
Uday Samant, Ravindra DhangekarSarkarnama

Maharashtra Politics Marathi News : अनुल्लेखाने मारण्याची, दखल न घेण्याची काही राजकीय नेत्यांची सवय असते. दिग्गज नेत्यांना एखादेवेळी हे शोभू शकते, मात्र आता मंत्रीही आमदारांबाबत अशी भाषा वापरत आहेत. मंत्री चंद्रकांतदादा यांना अशा प्रकारामुळे नामुष्की सहन करावी लागली होती. त्यापासून कोणताही धडा न घेता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अशाच बेदरकार वृत्तीचे प्रदर्शन केले आणि लगेच त्यांना त्याचे सडेतोड उत्तरही मिळाले आहे. Who Is Dhangekar

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर Ravindra Dhangekar विजयी झाले. सामान्य लोकांमध्ये मिसळणारे नेतृत्व, अशी धंगेकर यांची ओळख आहे. त्या पोटनिवडणुकीच्या प्रचारात मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले होते, व्हू इज धंगेकर? म्हणजे धंगेकर यांची त्यांना दखल घ्यायची नव्हती. निवडणुकीत असे डावपेच वापरले जातात, मात्र ते अनुभवी चंद्रकांतदादांच्या अंगलट आले होते. त्या मुद्द्याला धरून धंगेकर यांच्या यंत्रणेने प्रचार सुरू केला. प्रचारात या मुद्द्याचा खुबीने वापर करण्यात आला. धंगेकर विजयी झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापूर शहरात 'धिस इज धंगेकर' असे पोस्टर लावण्यात आले होते. 'व्हू इज धंगेकर' म्हणणे अशा पद्धतीने चंद्रकांत पाटील यांच्या अंगलट आले होते.

आता पुण्यातील हिट अँड रन प्रकरणाची देशभरात चर्चा होत आहे. या प्रकरणात सुरवातीला घेतलेल्या भूमिकेमुळे पोलिस आणि राज्याच्या गृह विभागाची बेअब्रू झाली आहे. माध्यमांनी धारवेर धरल्याने आणि जनरेटा वाढल्याने पोलिस सुतासारखे सरळ झाले आहेत. तत्पूर्वी, आपल्या पोर्श कारने दोन जणांचा बळी घेणाऱ्या अल्पवयीन आरोपीला लागलीच जामीन मिळाला होता. पोलिसांना ताळ्यावर आणण्यासाठी आमदार रवींद्र धंगेकर यांनीही महत्वाची भूमिका बजावली होती. 19 मेच्या मध्यरात्री ही दुर्घटना घडली होती. उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis 21 मे रोजी अचानक पुणे पोलिस मुख्यालयात दाखल झाले होते. पुणे पोलिसांच्या कारभारावर देशभरातून टीका होऊ लागल्यामुळे तिसऱ्या दिवशी ते पुण्यात आले होते. एफआयआरची प्रत्यक्ष कॉपी वेगळी आहे आणि फडणवीस वेगळेच सांगत आहेत, असा आरोप आमदार धंगेकर यांनी केला होता, असे म्हणत एका पत्रकाराने उद्योगमंत्री उदय सामंत यांना प्रश्न विचारला होता.

Uday Samant, Ravindra Dhangekar
Nilesh Lanke News : चर्चा होणारच, नीलेश लंकेंना सासूरवाडीतून किती मताधिक्य?

उदय सामंत uday Samant यांनी पत्रकाराच्या या प्रश्नाला बेदरकारपणे उत्तर दिले. धंगेकर आहेत कोण, असा प्रतिप्रश्न सामंत यांनी केला. ते काँग्रेसचे आमदार आहेत, असे त्यांना पत्रकारांनी सांगितले, त्यावर, आपण धंगेकर यांच्या पत्रकार परिषदेला किंमत देत नाही, असे ते म्हणाले. पुढे त्यांनी फडणवीस यांनी या प्रकारणात काय काय केले, याची माहिती पत्रकारांना दिली. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. हिट अँड रनचे प्रकरण पोलिसांनी इतके हाताबाहेर घालवले होते की त्यासाठी गृहमंत्र्यांना पोलिस आय़ुक्तालयात यावे लागले. हे पोलिसांसह गृह मंत्रालयाचेही अपयश आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नसावी. धंगेकर आहेत कोण, या मंत्री सामंत यांच्या प्रश्नाला दुसऱ्याच दिवशी चपखल उत्तर मिळाले आहे.

Uday Samant, Ravindra Dhangekar
Indapur Tehsildar Attack News : मिरचीची पूड टाकली अन् लोखंडी रॉडने...; इंदापुरात तहसीलदारांवर अज्ञातानं केला हल्ला

आमदार धंगेकर यांनी पोलिसांचे गैरव्यवहार उघडकीस आणण्याची मालिकाच सुरू केली आहे. त्यांनी याबाबत ट्विटरवर माहिती देत पोलिसांचा पहिला कारनामा उघड करत असल्याचा दावा केला आहे. पब्स आणि हॉटेलमधून पोलिस कशाप्रकारे हप्ते गोळा करतात, हे धंगेकर यांनी सांगितले आहे. त्यांनी त्याबाबतचा व्हिडिओही ट्विट केला आहे. मुंढवा पोलिस ठाण्यातील तीन पोलिस कर्मचाऱ्यांचा हा व्हिडीओ असल्याचा धंगेकर यांचा दावा आहे. या कर्मचाऱ्यांवर येत्या 48 तासांत कारवाई करावी, अन्यथा आणखी व्हिडिओ ट्विट करण्यात येतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

''कल्याणीनगर हिट अँड रन Pune Hit and run Case प्रकरणाच्या तपासात अक्षम्य चुका होऊनही पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना अद्यापही कुणी दोषी असल्याचे वाटत नाही. जो स्वतः बिल्डरच्या पाकिटावर काम करतोय तो कुणावर कशी कारवाई करणार,'' असा प्रश्न उपस्थित करत आमदार धंगेकर यांनी दररोज एका पोलिस ठाण्याचा गैरव्यवहार चव्हाट्यावर आणणार असल्याचा इशारा उपमुख्यमंत्री फडणवीस यांना दिला आहे.

Uday Samant, Ravindra Dhangekar
Nashik Lok Sabha Election 2024 : लोकसभेतील मतांची आघाडी ठरविणार सीमा हिरे यांचे राजकीय भवितव्य?

धंगेकर कोण आहेत, मी त्यांना किंमत देत नाही... असे म्हणणाऱ्या मंत्री सामंत यांनाही याद्वारे धंगेकर यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. त्यामुळे पुण्यातील 'हिट अँड रन' प्रकरणाच्या निमित्ताने पोलिसांचे अनेक गैरव्यवहार उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. व्हू इज धंगेकर म्हणणाऱ्या चंद्रकांतदादांची अडचण झाली होती. तशीच अडचण आता मंत्री सामंत यांचीही होण्याची शक्यता आहे. आमदाराच्या वक्तव्याला किंमत देत नाही, असे एक मंत्री कसे म्हणू शकतो, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आमदाराने केलेले आरोप चुकीचे असतील तर त्याला तसे उत्तर देण्यास कुणाचीही हरकत नसावी. मात्र आपल्यासाठी अडचणीचे ठरू पाहणारे प्रश्न विचारणाऱ्या आमदाराबाबत, कोण आहेत ते, असे सरंजामी वृत्तीला शोभेल असे उत्तर जनता सहन करणार नाही, हे पुणे हिट 'अँड रन; प्रकरणाच्या निमित्ताने सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी नीट लक्षात घ्यायला हवे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com