Balasaheb Thorat Crime : श्रीरामपूरच्या वाढत्या गुन्हेगारीवर बाळासाहेब थोरातांची तीव्र चिंता; 'मुख्यमंत्र्यांना पत्र धाडणार', पाळेमुळे सांगणार?

Balasaheb Thorat demands strict action against rising crime in Shrirampur : श्रीरामपूरमधील वाढत्या गुन्हेगारीवर माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी चिंता व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिणार असल्याचे सांगितले.
Balasaheb Thorat cm devendra fadnavis
Balasaheb Thorat cm devendra fadnavissarkarnama
Published on
Updated on

Shrirampur Crime News : श्रीरामपूर शहरातील वाढत्या गुन्हेगारीबाबत माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी चिंता व्यक्त केली आहे. शहरातील गुन्हेगारीचे जाळे केवळ श्रीरामपूरपुरते मर्यादित नसून संगमनेर, कोपरगाव तसेच इतर तालुके आणि जिल्ह्याबाहेरही पसरल्याचा दावा त्यांनी केला. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने गुन्हेगारीची पाळेमुळे शोधून तिचे समूळ उच्चाटन करावे, अशी मागणी त्यांनी केली.

हॉटेल व्यावसायिक आकाश शेखर दुबय्या यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर नगरपालिकेत पत्रकारांशी संवाद साधताना बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) बोलत होते. यावेळी आमदार हेमंत ओगले, नगराध्यक्ष करण ससाणे, जिल्हाध्यक्ष सचिन गुजर, बाबासाहेब दिघे आणि शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर उपस्थित होते.

काँग्रेसचे थोरात म्हणाले की, श्रीरामपूरमधील ( Shrirampur) कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. या संदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून परिस्थितीची माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Balasaheb Thorat cm devendra fadnavis
Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरातांसाठी वाढल्या अडचणी? ठाणे जमीन प्रकरणात हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश

'माझ्या कार्यकाळात वाळू तस्करीवर नियंत्रण होते'

वाळू तस्करीच्या मुद्द्यावर बोलताना थोरात म्हणाले, आपण महसूलमंत्री असताना वाळू तस्करीवर प्रशासनाचे नियंत्रण होते. त्या काळात कोणत्याही कार्यकर्त्याला वाळूचे ठेके देण्यात आले नव्हते. सध्याची परिस्थिती मात्र बदलल्याचे त्यांनी नमूद केले.

सोनम वांगचुक प्रकरणावर प्रतिक्रिया

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाईबाबतही थोरात यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. लडाखमधील जनतेच्या प्रश्नांसाठी आणि सांस्कृतिक ओळख जपण्यासाठी वांगचुक कार्यरत असल्याचे सांगत त्यांनी त्यांच्या आंदोलनावरील कारवाईवर आक्षेप नोंदवला.

Balasaheb Thorat cm devendra fadnavis
Balasaheb Thorat : ‘कोट्यवधींचं आमिषही फेल!’ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’समोर हा खासदार झुकला नाही, थोरातांनी सांगितली मोठी गोष्ट

NEET पेपरफुटीवरही भाष्य

NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावर बोलताना थोरात यांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित अशा घटनांबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास कायम ठेवण्यासाठी या प्रकरणातील जबाबदारांवर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सर्वसामान्य कुटुंबे मोठे कष्ट घेत असताना अशा घटना दुर्दैवी असल्याचे त्यांनी नमूद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com