Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरात 'लय जोरात'; थोरातांसाठी नगर काँग्रेस पक्षश्रेष्ठींना घालणार मोठी गळ

Balasaheb Thorat demand to contest the Ahmednagar city assembly : पंकजा मुंडे यांनी नगर शहरातून विधानसभेची निवडणूक लढवावी, असे पत्र नगर शहर भाजपने प्रदेशला धाडलं आहे. आता बाळासाहेब थोरात यांनी नगर शहरातून विधानसभा निवडणूक लढवावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशने केली आहे.
Balasaheb Thorat
Balasaheb Thoratsarkarnama

Ahmednagar News : लोकसभा निवडणुकीत 'किंगमेकर'ची भूमिका पार पाडलेल्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडून नगर शहरातील काँग्रेस नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. जिल्ह्याचे मध्यवर्ती असलेल्या नगर शहर मतदारसंघातून बाळासाहेब थोरात यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवावी, यासाठी पक्षश्रेष्ठींना गळ घालणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेश सचिव दीपक चव्हाण यांनी संकेत दिलेत.

लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघातून पराभूत झालेल्या पंकजा मुंडे झाल्या. भाजपचे नगर शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी पंकजा मुंडे यांनी नगर शहरातून विधानसभेची निवडणूक लढवावी. आगरकर यांनी तसे पत्र भाजप प्रदेशला धाडलं. यानंतर आता काँग्रेसचे दीप चव्हाण यांनी बाळासाहेब थोरात यांनी नगर शहरातून विधानसभा निवडणूक लढवावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे नगर शहर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीपूर्वीच चर्चेत आला आहे.

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा निकालात महाविकास आघाडीला कौल मिळाला. नगर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघ महाविकास आघाडीने जिंकले आहेत. यात काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. याशिवाय बाळासाहेब थोरात महाविकास आघाडीत विश्वासार्ह चेहरा म्हणून पुढे आलेत. लोकसभा निवडणुकीनुसार विधानसभा निवडणुकीचा निकाल उलटफेर होऊ शकतो.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

फसवा विकास दाखवणाऱ्या विद्यमान खासदाराला नगरकरांनी एकमतानं हरवले. त्यानंतर आता नगर शहर विधानसभा मतदारसंघात शहराच्या सर्वांगीण विकासाची जाण असलेले नेतृत्व मिळावे, अशी नगरकरांची अपेक्षा आहे. यासाठी नगर शहर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना उबाठा आणि मित्रपक्ष महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून बाळासाहेब थोरात यांच्या नावाला सर्वांनी मान्यता द्यावी, असे दीप चव्हाण यांनी म्हटले आहे.

Balasaheb Thorat
Sadashiv Lokhande : विखे पुत्रासाठी दक्षिणेत गुंतले, थोरातांनी हेरलं; मुख्यमंत्री मैदानात तरी लोखंडेंविरोधात वारं फिरलं!

यासाठी लवकरच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, महाविकास आघाडीचे समन्वयक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ते नगर शहराच्या विकासासाठी आग्रही असलेल्या राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळासह भेट घेणार असल्याचेही दीपक चव्हाण यांनी संकेत दिले.

नगरला दादाभाऊ कळमकर आमदार अनिल राठोड यांच्यानंतर हक्काचा माणूस मिळालेला नाही. बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉ. जयश्री थोरात त्यांच्या रूपाने संगमनेरला थोरात साहेबांचे उत्तरदायित्व या आमदारकीच्या निवडणुकीत मिळावे आणि थोरात साहेबांनी नगर शहरातून निवडणूक लढवावी म्हणजे नगर शहराचा संगमनेर प्रमाणे शाश्वत विकास होईल. नगर शहरात आता तर दहशत, गुंडगिरी, ताबेमारीचा सपाटाच सध्या सुरु आहे. यामुळे नगर बदनाम होते आहे. थोरात साहेबांचे नेतृत्व नगर शहराला मिळाल्यास विकासाचा रथ काय असतो, ते नगरकरांना देखील पाहायला मिळेल, असेही दीप चव्हाण यांनी म्हटले आहे.

Balasaheb Thorat
Pankaja Munde : विखेंवरचा विश्वास उडाला, पंकजा मुंडेंसाठी नगर भाजपनं श्रेष्ठींना पत्र धाडलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com