Ahmednagar News : नगर दक्षिणमध्ये भाजपचा पराभव झाल्याबरोबर भाजपचा विखेंवरचा विश्वास उडाल्याचे दिसते आहे. बीडमध्ये विजयाने चकवा दिलेल्या पंकजा मुंडेंसाठी नगरची भाजप सरसावली आहे. नगर भाजपने विधानसभेसाठी पंकजा मुंडे यांना नगर शहरातून संधी द्यावी, अशी मागणीचं पत्र पक्षश्रेष्ठींना धाडलं आहे.
भाजपचा उत्तर महाराष्ट्रात चांगलाच धक्का बसला आहे. संस्थानिक म्हणून ओळखले जाणारे दिग्गज नेते पराभूत झाले. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांचे पुत्र खासदार सुजय विखे यांचा नीलेश लंकेंकडून पराभव झाला. नगर भाजपकडून या पराभवाचे खापर विखे यंत्रणेवर रोष व्यक्त करत असतानाच पक्ष नेतृत्वाकडे नगर शहर विधानसभा मतदारसंघाबाबत पंकजा मुंडे यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली आहे. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी याबाबतचे पत्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवलं आहे.
राज्यात पक्ष संघटनेचं काम करण्याची तयार भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तयारी दर्शवली आहे. त्यासाठी त्यांनी मंत्रीपद सोडण्याची तयारी दाखवली आहे. असे असतानाच नगर शहर भाजप आगामी विधानसभेसाठी वेगळ्याच भूमिकेत आहे. भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांनी पराभवाने खचून न जाता नव्या जोमाने विधानसभेची तयारी करावी.
नगर शहर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीची संधी द्यावी, अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे नगर शहर भाजपने केली आहे. ही मागणी करताना सुजय विखे यांना नगर शहर विधानसभा मतदारसंघातून मिळालेल्या मताधिक्याकडे लक्ष वेधले आहे. यातून भाजपला नगरमध्ये पोषण वातावरण असल्याचे अभय आगरकर यांनी पत्रात सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पंकजा मुंडे यांच्यासारख्या संघर्षशील आणि लढवैय्या नेत्रृत्वाला नगर शहरामधून विधानसभा निवडणूकीचे तिकीट दिल्यास त्या निश्चितच विजयी होतील. राष्ट्रीय व राज्य पातळीवरील पक्षाच्या अध्यक्षांना पत्र पाठवून पंकजा मुंडे यांना नगरमधून तिकीट देण्याची मागणी केल्याचे अभय आगरकर यांनी सांगितले.
अभय आगरकर म्हणाले,"लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी कायम नगर शहरावर प्रेम केले. राज्याचे उपमुख्यमंत्री असताना त्यांनी नगर शहराचा पाणी प्रश्न सोडवण्याबरोबरच शहरातील गुंडगिरीलाही लगाम त्याकाळात घातला होता. त्यांचा कामाचा वारसा पंकजा मुंडे या पुढे नेत आहेत. मुंडे परिवाराचे नगरशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी नगर शहरातून विधानसभा निवडणूक लढवावी, अशी आमची पक्षश्रेष्ठींकडे मागणी आहे."
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.