abhishek ghosalkar, tejswini ghoslakar
abhishek ghosalkar, tejswini ghoslakar sarkarnama

Abhishek Ghosalakar: अभिषेक घोसाळकरांचे प्लॅनिंग ठरलं होतं, पत्नी मुलांसह जाणार होते; पण...

Political News : अभिषेक घोसाळकर हे आपल्या पत्नी आणि मुलांसह फिरायला जाण्यासाठी निघणार होते.
Published on

Mumbai News : दहिसरमध्ये ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी (ता.8) रात्री हत्या झाली. फेसबुक लाइव्ह करणाऱ्या मॉरिस नावाच्या व्यक्तीने अभिषेक यांच्यावर गोळ्या झाडल्या. मॉरिसने स्वत:देखील आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण दहिसर परिसर हादरला आहे.

या घटनेचा तपास पोलिस यंत्रणा करीत आहे. दरम्यान, अभिषेक घोसाळकर हे आपल्या पत्नी आणि मुलांसह शुक्रवारी कुलू मनालीला फिरायला जाण्यासाठी निघणार होते. तत्पूर्वीच आदल्याच रात्री काळाने घाव घातला.

abhishek ghosalkar, tejswini ghoslakar
CM Eknath Shinde Birthday : 'काय झाडी...' नंतर शहाजीबापूंना आलेलं टेन्शन मुख्यमंत्री शिंदेंनी एका वाक्यात दूर केलं...

अभिषेक घोसाळकर आणि तेजस्विनी घोसाळकर यांच्या लग्नाचा वाढदिवस 14 फेब्रुवारीला असल्याने शुक्रवारीच ते पत्नी आणि मुलांसह कुलू मनालीला फिरायला जाण्यासाठी निघणार होते. अभिषेक हे कुलू मनालीला जाणार असल्याने शुक्रवारच्या फ्लाइटचे बुकिंग करण्यात आले होते.

14 फेब्रुवारी रोजी अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) आणि तेजस्विनी घोसाळकर यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. तो साजरा करण्यासाठी अभिषेक घोसाळकर हे आपल्या पत्नी मुलांसह दरवर्षी बाहेर जात असतात. त्यानुसार यावर्षी त्यांनी कुलू मनालीला जाण्यासाठी काही दिवसांपूर्वीच बुकिंग करून ठेवले होते. निघण्याची तयारी पूर्ण झाली होती. मात्र, निघण्याच्या आदल्याच रात्री काळाने घाव घातला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, या घटनेने त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यानिमित्ताने अभिषेक यांचे बाहेर फिरायला जाण्याचे प्लॅनिंग अधुरे राहिले असल्याची भावना सर्वसामान्यातून व्यक्त केली जात आहे.

R

abhishek ghosalkar, tejswini ghoslakar
Abhishek Ghosalkar Shot Dead Update : यूपीच्या बंदुकीने केला अभिषेक घोसाळकर यांचा घात?
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com