Balasaheb Thorat : राऊत दाम्पत्याबरोबर घडलेल्या घटनेवरून थोरातांचा महायुती सरकारवर निशाणा, म्हणाले...

Balasaheb Thorat on Raut Couple : '...या सगळ्या प्रकरणाची सखोल उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे.', अशी मागणीही बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
Balasaheb Thorat
Balasaheb ThoratSarkarnama
Published on
Updated on

Balasaheb Thorat criticized Mahayuti Government News : जळगावमधील सरकारी अधिकारी मयुरी देवेंद्र राऊत-करपे (वय 32) यांचा हृदयविकाराच्या धक्क्यानं झालेला मृत्यू आणि त्यांचे पती अधिकारी देवेंद्र राऊत यांच्यावर सुरू असलेल्या नियमित वैद्यकीय उपचारांवरून काँग्रेस विधिमंडळ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. थोरातांनी हे एकप्रकारे महायुती सरकारकडून अधिकाऱ्यांवरील दबावतंत्रातून घडले असण्याचीही शक्यता व्यक्त केली आहे.

काँग्रेस (Congress) नेते बाळासाहेब थोरात यांनी जळगावमधील या घटनेची उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली. 'नेमकी ही घटना कशाच्या माध्यमातून झाली, याची सखोल चौकशी होऊन राऊत दाम्पत्याला आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला पाहिजे', अशी भूमिका बाळासाहेब थोरातांनी मांडली आहे.

Balasaheb Thorat
Anna Hazare on Arvind Kejriwal : केजरीवालांची मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याची घोषणा अन् अण्णा हजारेंची खास प्रतिक्रिया, म्हणाले..

बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat ) म्हणाले, "जळगावमध्ये अधिकारी दाम्पत्याबाबत घडलेली घटना अत्यंत वेदनादायी आहे. मंत्रालयाच्या माध्यमातून वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेश देऊन, ते राबविण्यासाठी दबाबतंत्र महाराष्ट्रात सुरू आहेत. त्यातून ही दुर्दैवी घटना घडली". मंत्रालयातून नेमकं कोण आदेश देत होते? कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दबाव होता? या सगळ्या प्रकरणाची सखोल उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. ही चौकशी उघड व्हावी, आणि यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे.'' असे देखील बाळासाहेब थोरातांनी म्हटलं.

राऊत दाम्पत्याबरोबर नेमकं काय घडलं? -

देवेंद्र राऊत जळगावमधील जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभागातील जिल्हा कार्यक्रम अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या पत्नी शासकीय आशादीप महिला वस्तीगृहाच्या अधीक्षका मयुरी देवेंद्र राऊत-करपे (रा. श्रीरामनगर, दादावाडी परिसर, जळगाळ) म्हणून काम पाहायच्या. देवेंद्र राऊत गेल्या काही दिवसांपासून नियमित आजारी आहेत. त्यांच्या नियमित तपासण्या सुरू असल्यानं मयुरी या त्यांना दुचाकीवरून रुग्णालयात नेत असत. मयुरी यांनी पती देवेंद्र यांना दुचाकीवरून शनिवारी रुग्णालयात आणलं. त्यावेळी तिथं मोबाईलवर बोलत असताना, मयुरी अचानक खाली कोसळल्या. मयुरी यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासलं असताना, त्यांचा हृदयविकारानं मृत्यू झाल्याचं समोर आलं.

Balasaheb Thorat
Rahul Gandhi : 'राहुल गांधी देशातील नंबर-1 दहशतवादी, त्यांच्यावर तर..' ; केंद्रीयमंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य!

पतीचा आत्महत्येचा प्रयत्न -

या घटनेनं त्यांचे पती देवेंद्र राऊत यांना मानसिक धक्का बसला आणि त्यांनी एका इमारतीवरून चढून आत्महत्येचा प्रयत्न केला. देवेंद्र यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांना पुढं 72 तास वैद्यकीय निगराणीखाली ठेवण्यात आलं आहे. राऊत दाम्पत्याला गौरी आणि गाथा, अशा दोन मुली आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com