Congress Politics: इगतपुरीत काँग्रेसचे वेगळे बिऱ्हाड? उमेदवार लकी जाधव यांना पदाधिकाऱ्यांची नो एन्ट्री?

Igatpuri Assembly Constituency: चुकीचा उमेदवार दिल्याची पदाधिकाऱ्यांची भावना, इगतपुरीत काँग्रेसची अवस्था दयनीय बनली
Hiraman Khoskar & Nirmala Gavit
Hiraman Khoskar & Nirmala GavitSarkarnama
Published on
Updated on

Nirmala Gavit News: इगतपुरी मतदार संघात काँग्रेसने लकी जाधव यांना उमेदवारी दिली. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी थेट राहुल गांधी आणि पक्षाचे संपर्क नेते रमेश चेन्नीथला यांच्याकडे तक्रारी केल्या. इगतपुरीच्या उमेदवारामुळे लगतच्या तालुक्यातही पक्षाचे पदाधिकारी निराश झाले आहेत.

काँग्रेस पक्षाच्या इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीचा वाद आता टोकाला पोहोचला आहे. दोन दिवसापूर्वी पदाधिकाऱ्यांनी थेट पक्षनेते राहुल गांधी आणि महाराष्ट्राचे संपर्क नेते रमेश चेन्नीथला यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. स्थानिक पातळीवर पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते.

त्यानंतर खडबडून जागे झालेल्या पक्षाने केंद्रीय निरीक्षकांचे प्रतिनिधी इगतपुरी मतदारसंघात पाठविले. त्यांनी विविध पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. यावेळी त्यांनी अक्षरशः गयावया करीत, आहे त्या उमेदवाराचा प्रचार करावा अशी विनवणी केली.

राजीनामे दिलेल्या पदाधिकाऱ्यांची समजूत घालावी. पक्षाची प्रतिष्ठा कायम राहील, असे काम करण्याच्या विनवण्या केल्या. यावेळी त्यांनी काही पदाधिकाऱ्यांना दिवाळीचे "गिफ्ट"देखील दिले. त्यामुळे केंद्रीय निरीक्षकांच्या भूमिकेबाबत अनेक पदाधिकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

Hiraman Khoskar & Nirmala Gavit
Jayant Patil : 'घोषणाबाजांची खुर्ची जनताच हिसकावून घेणार'; जयंत पाटलांची भरपूर टोलेबाजी

इगतपुरी मतदारसंघात लकी जाधव या अकोला (संगमनेर) येथील उमेदवाराला उमेदवारी देण्यात आली आहे. या उमेदवाराच्या कर्तुत्वाच्या अनेक सुरस कथा चर्चेत आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी असा अनपेकक्षित निर्णय कसा घेतला, याचीही चर्चा आहे.

इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी माजी आमदार निर्मला गावित यांच्या उमेदवाराची एकमताने शिफारस केली होती. मात्र हा पर्याय असताना पक्षाकडून अतिशय नवख्या उमेदवाराला उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे पदाधिकारी नाराज आहेत.

सध्या केंद्रीय निरीक्षकांचे प्रतिनिधी इगतपुरी मतदार संघातील काँग्रेसच्या विविध पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र त्यात त्यांना फारसे यश आलेले नाही. काँग्रेस पक्षाचे बहुतांश पदाधिकारी आता माजी आमदार निर्मला गावित यांच्या गोटात दाखल झाले आहेत.

Hiraman Khoskar & Nirmala Gavit
Manikrao Shinde Politics: भुजबळ यांनी शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला, त्याचा हिशेब निवडणुकीत घेऊ!

या सर्व नाराज पदाधिकाऱ्यांनी श्रीमती गावित यांना अपक्ष उमेदवारी करावी असा आग्रह धरला आहे. माजी आमदार गावित यांनी देखील सोमवारी आपल्या उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी पक्षाकडून आपल्याला उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. याबाबतचा अंतिम निर्णय उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी घेऊ असे स्पष्ट केले.

इगतपुरी मतदार संघातील उमेदवार लकी जाधव यांची उमेदवारी बदलावी यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मोठा दबाव आहे. पक्षाने सोमवारी उत्तर कोल्हापूर मतदारसंघात उमेदवार बदलला. त्यामुळे इगतपुरी मतदारसंघात देखील वेगळा निर्णय होतो का? याची उत्सुकता आहे. सध्या काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या इगतपुरी तालुक्यातील बहुतांश पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या उमेदवारापासून अंतर ठेवणे पसंत केले आहे.

महाविकास आघाडीच्या राजकीय स्थिती अतिशय गंभीर बनली आहे. विशेष म्हणजे ज्यांना उमेदवारी जाहीर झाली, ते लकी जाधव अद्याप कोणत्याही पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलेले नाही. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.

त्यांना काँग्रेस पक्षाने एबी फॉर्म दिला आहे. त्यामुळे आज ते आपल्या उमेदवारी अर्ज दाखल करतील. अर्ज दाखल करताना त्यांच्याबरोबर पक्षाचे कोणते पदाधिकारी असतील यातून देखील मतदारांसाठी आणि पक्षासाठी वेगळ्या संदेश जाऊ शकेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com