Igatpuri Congress : इगतपुरीमध्ये लकी जाधव यांच्या उमेदवारीचा निषेध, ६५ काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे राजीनामे!

Igatpuri Assembly constituency: धक्कादायक स्थानिकांची शिफारस निर्मला गावित यांची, नेत्यांनी उमेदवारी दिली अनोळखी लकी जाधव यांना.
Nirmala Gavit & Balasaheb Thorat
Nirmala Gavit & Balasaheb ThoratSarkarnama
Published on
Updated on

Congress News: काँग्रेस पक्षात उमेदवारीचा सावळा गोंधळ सुरूच आहे. याचे ताजे उदाहरण इगतपुरी मतदारसंघात घडले. ज्या नावाची कोणी शिफारसच केली नाही, अशा अनभिज्ञ उमेदवाराला पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे.

इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील क्रॉस वोटींगमध्ये अडकलेल्या काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केला. त्यानंतर पक्षाला प्रबळ उमेदवार कोण? असा प्रश्न निर्माण झाला.

या मतदारसंघात पंधरा उमेदवारी इच्छुक होते. त्यामुळे पक्षाकडे निवड करण्यास वाव होता. मात्र त्यात निवडून येण्याची क्षमता या निकषात हे उमेदवार बसत नव्हते. त्याला उत्तर म्हणून माजी आमदार आणि शिवसेनेच्या उपनेत्या निर्मला गावित यांचा पक्षाने विचार करावा, अशी मागणी झाली.

यासंदर्भात पक्षाचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी स्थानिक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत विचारविनिमय करून निर्णय घ्यावा, अशी सूचना केली होती. त्यानुसार त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुका पदाधिकारी व स्थानिक कार्यकारिणी सदस्यांनी बैठक घेतली.

Nirmala Gavit & Balasaheb Thorat
Mahavikas Aghadi: नंदुरबारमध्ये ठाकरेंचा तर नाशिकमध्ये काँग्रेसचा निवडणूक प्रचारात परस्परांशी असहकार!

त्यात एकमताने माजी आमदार निर्मला गावित यांना उमेदवारी द्यावी, असा ठराव करण्यात आला. या ठरावानंतर पक्षाचे सर्व पदाधिकारी इगतपुरी येथे एसएमबीटी महाविद्यालयात विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांना भेटले.

मतदारसंघात पक्षाची स्थिती बिकट आहे. त्यामुळे माजी आमदार निर्मला गावित या सर्व दृष्टीने सक्षम उमेदवार आहेत. त्यांना उमेदवारी द्यावी, असा निर्णय एकमताने कळविण्यात आला. श्री थोरात यांनी देखील त्याला संमती दिली.

मात्र जेव्हा उमेदवारांची यादी जाहीर झाली, तेव्हा अकोला (संगमनेर) तालुक्यातील आणि श्री थोरात यांच्या संपर्कात असलेल्या लकी जाधव या व्यक्तीला उमेदवारी जाहीर करण्यात आली. संबंधित व्यक्ती इगतपुरी तालुक्यातील नाही. ते फारसे परिचित देखील नाही.

Nirmala Gavit & Balasaheb Thorat
Shrirampur Constituency Election : महायुतीने श्रीरामपुरच्या राजकारणात आणला मोठा ट्विस्ट; अजितदादा अन् आमदार कानडेंना लागली लॉटरी

श्री. जाधव यांच्या बाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी आहेत. असे असताना अशा व्यक्तीला उमेदवारी मिळालीच कशी? याचा धक्का पक्षाच्या कार्यकर्त्यांना बसला. दोन दिवसापूर्वी त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली. अनेक कार्यकर्त्यांनी थेट पक्षाचे नेते राहुल गांधी आणि महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चैनीतला यांच्याकडे याबाबत तक्रारी केल्या.

अनेकांनी थेट नेत्यांशी संपर्क करून लकी जाधव यांना उमेदवारी दिल्यास पक्षाचा दारुण पराभव होईल, अशी जाणीव करून दिली. त्यानंतर पक्षाची यंत्रणा जागृत झाली. रविवारी पक्षाने इगतपुरी मतदारसंघासाठी दोन निरीक्षक पाठविले होते.

तत्पूर्वी पक्षाच्या ६५ पदाधिकाऱ्यांनी लकी जाधव यांच्या उमेदवारीच्या निषेधार्थ काँग्रेसचे प्रदेश चिटणीस भास्कर गुंजाळ यांच्याकडे राजीनामे दिले आहेत. रविवारी पक्ष निरीक्षकांची यासंदर्भात पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली.

येत्या २४ तासात पक्षाने उमेदवार बदलून माजी आमदार निर्मला गावित यांना उमेदवारी द्यावी. तसे न झाल्यास पक्षाचे सर्व पदाधिकारी राजीनामे देतील. प्रसंगी इगतपुरी मतदारसंघात सांगली पॅटर्न राबविला जाईल.

सर्व पदाधिकारी व पक्षाचे इच्छुक उमेदवार निर्मला गावित यांनी अपक्ष उमेदवारी करावी असा आग्रह करणार आहेत. या सर्व घडामोडींमुळे काँग्रेसचे निरीक्षक आणि इगतपुरी चा उमेदवार ठरविणारे पक्षनेते यांच्याबाबत गंभीर शंका निर्माण होते. पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमुखाने शिफारस केली. माजी आमदार निर्मला गावित यांची मात्र उमेदवारी मिळाली. लकी जाधव या अनोळखी व्यक्तीला त्यामुळे हे जाणीवपूर्वक घडले, की अनावधानाने हा चर्चेचा विषय आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com