Mahavikas Aghadi: नंदुरबारमध्ये ठाकरेंचा तर नाशिकमध्ये काँग्रेसचा निवडणूक प्रचारात परस्परांशी असहकार!

Uddhav-Congress Clash in Nandurbar and Nashik: महाविकास आघाडीत सुरू आहे परस्परांशी असहकार आणि जागा वाटपाचा वाद
Sharad Pawar, Laxman Mandale & Sharad Patil
Sharad Pawar, Laxman Mandale & Sharad PatilSarkarnama
Published on
Updated on

Shivsena Vs Congress: महाविकास आघाडीने जागावाट आणि उमेदवारीच्या घोषणा पूर्ण केल्या आहेत. मात्र त्यानंतर सहकारी पक्षांमध्येच तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. विरोधकांपेक्षा स्वपक्षातील नेत्यांची समजूत काढण्याची वेळ उमेदवारांवर आली आहे.

नंदुरबार जिल्ह्यात सर्वच्या सर्व चारही मतदारसंघांमध्ये काँग्रेस पक्षाला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षाने उमेदवार देण्यात देखील आघाडी घेतली. मात्र उमेदवारी जाहीर केल्यानंतर प्रचाराला सुरुवात होण्याआधीच काँग्रेसमध्येच बंडाचा झेंडा फडकला आहे.

ही कमतरता होती की काय म्हणून आता सहकारी पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्तेही नाराज झाले आहेत. स्थानिक पातळीवर या दोन्ही पक्षांमध्ये टोकाचे मतभेद निर्माण झाले आहेत. हे मतभेद केव्हा आणि कसे दूर होणार, विधानसभा निवडणुकीचा विचार करता त्यासाठी पुरेसा वेळ आहे का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नंदुरबार येथे संपर्क नेते माजी आमदार शरद पाटील यांच्या उपस्थितीत झाली. ही बैठक प्रामुख्याने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी होती. प्रत्यक्षात मात्र शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस विरोधात सूर आळवला.

Sharad Pawar, Laxman Mandale & Sharad Patil
Seema Hiray Politics: नगरसेवक शशिकांत जाधव यांचे बंड; आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात दुसरी बंडखोरी!

नंदुरबारच्या विविध ठिकाणी सत्तेत असलेले काँग्रेस आमदार आणि अन्य पदाधिकारी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना महत्त्व देत नाहीत. कार्यकर्त्यांना निमंत्रित केले जात नाही. विविध शासकीय समित्यांवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची नावे सुचविली जात नाहीत.

त्यामुळे शिवसेनेला जनमाणसात काम करणे अवघड झाले आहे. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणे शक्य होत नाही. अशा स्थितीत काँग्रेस पक्षाच्या प्रचारात शिवसेना सतत महत्त्वाची भूमिका बजावत आली आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या मतांमध्ये शिवसेनेचा मोठा वाटा होता. मात्र निवडणूक संपल्यावर काँग्रेस नेत्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना काहीही महत्त्व दिले नाही. त्यामुळे नंदूरबार जिल्ह्यातील कार्यकर्ते नाराज आहेत.

Sharad Pawar, Laxman Mandale & Sharad Patil
Laxman Mandale: संतप्त लक्ष्मण मंडाले म्हणाले, "जागा वाटपात माझा बळी दिला"

या संतापातूनच संपर्क नेते माजी आमदार पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी महाविकास आघाडीच्या उमेदवारालाच मतदान करतील. मात्र थेट प्रचारात कोणीही सहभागी होणार नाही. काँग्रेसच्या प्रचारावर बहिष्कार टाकत असल्याची घोषणा केली.

नाशिक जिल्ह्यात देखील अशीच स्थिती आहे. शहरातील चार पैकी तीन मतदारसंघ शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला सोडण्यात आली आहे. या पक्षाने तिन्ही ठिकाणी उमेदवार जाहीर केले आहेत. काँग्रेस पक्षाला एकही मतदारसंघ मिळाला नाही.

विशेषतः नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराकडून मोठ्या प्रमाणात निवडणुकीची तयारी करण्यात आली होती. पक्षाचे प्रदेश सचिव राहुल दिवे आणि माजी नगरसेविका डॉक्टर हेमलता पाटील या प्रमुखी इच्छुक होत्या. मतदारसंघ न सोडल्याने त्यांच्यात निराशा पसरली आहे.

श्री दिवे यांनी थेट दिल्ली गाठत पक्षाच्या वरिष्ठांकडे मैत्रीपूर्ण लढतीची मागणी केली. डॉ पाटील यांनी समर्थकांचा मेळावा घेतला. आपल्यावर अन्याय झाला, असा सूर त्यांनी लावला होता. त्यामुळे अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला.

अशीच स्थिती देवळाली मतदारसंघात लक्ष्मण मंडाले यांच्या समर्थकांनी घेतलेल्या बैठकीत होती. पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करायचा नाही अशी भूमिका घेतली. या संदर्भात पक्षाचे वरीष्ठ नेते जोपर्यंत सूचना करीत नाहीत, तोपर्यंत महाविकास आघाडीचा प्रचार करायचा नाही. या असहकाराला आगामी महापालिका निवडणुकीचे संदर्भ आहेत.

विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने अक्षरशः दादागिरी करीत जागा वाटप होण्याआधीच उमेदवारांना एबी फॉर्म दिले. त्यामुळे काँग्रेस पक्षाला फारसे महत्त्व दिले नाही. त्यामुळे महापालिका निवडणुकीत काय भूमिका असेल, हे स्पष्ट झाल्याशिवाय पुढचे पाऊल टाकले जाणार नाही अशी भूमिका घेतली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com