राज्यात आपले सरकार आहे, पण आम्हाला कोणी विचारीतही नाही!

काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची तालुकानिहाय आढावा बैठक त्र्यंबकेश्वर येथे झाली.
Congress leaders welcome Balasaheb Thorat & Praniti Shinde
Congress leaders welcome Balasaheb Thorat & Praniti ShindeSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : देशात व राज्यात भाजपला वैचारीक व जनतेच्या मनातील खरा पर्याय फक्त काँग्रेस पक्षच आहे. ही भावना व सुप्त लाट मला जनतेत दिसते आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, पालिका, नगरपंचायत निवडणुकीच्या तयारीला अतिशय मनापासून कामाला लागले पाहिजे. त्यासाठी जनतेमध्ये जा, असा सल्ला काँग्रेस नेते व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Rebenue Minister Balasaheb Thorat) यांनी दिला.

Congress leaders welcome Balasaheb Thorat & Praniti Shinde
रोहित पवारांसमोरच राष्ट्रवादीचे दोन गट भिडले; पवार तिसऱ्या गटासोबत गेले!

काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची तालुकानिहाय आढावा बैठक त्र्यंबकेश्वर येथे झाली. यावेळी आघाडीचे सरकार आहे. पण, सरकारी समित्यांमध्ये स्थान मिळत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेकडून विश्‍वासात घेतले जात नाही, अशी घुसमट होत असल्याबद्दल जिल्ह्यातील काँग्रेसच्या कार्यकर्ते अन्‌ पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता असल्याचे चित्र महसूलमंत्री थोरात यांना पाहायला मिळाले.

काँग्रेसच्या जिल्ह्यातील तालुकानिहाय पदाधिकारी-कार्यकर्त्यांचे म्हणणे श्री. थोरात आणि काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्राच्या प्रभारी कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांनी ऐकून घेतले. प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र वेळ देण्यात आला.

Congress leaders welcome Balasaheb Thorat & Praniti Shinde
कितीही त्रास द्या, एकनाथ खडसे सहीसलामत सुटतील!

यावेळी आम्हाला साधे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून संधी मिळालेली नाही. सरकारी समित्यांमधील नियुक्त्यांसाठी याद्या देण्यात आल्या. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसकडून समित्यांमधील नेमणुकीची घोषणा केली जात नाही. शिवसेनेतर्फे तालुकास्तरीय समितीमध्ये बाहेरच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला संधी देत सर्व संधी शिवसेनेला दिली आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची उपेक्षा करण्यात आली आहे. दिंडोरी, सिन्नर, येवला, चांदवड, नाशिक अशा साऱ्याच तालुक्यांत ही परिस्थिती असल्याचे लक्षात येताच, श्री. थोरात यांनी सगळ्यांशी चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्‍वासन स्वकियांना दिले.

संघटनात्मक बांधणीवर लक्ष

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला जनतेकडून स्थान मिळाल्याचे राज्याने पाहिले आहे. त्यामुळे जनतेचा कल ध्यानात घेऊन आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे, असे प्रणिती शिंदे यांनी सांगितले. त्याचवेळी संघटनात्मक बांधणीकडे आपण विशेष लक्ष देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे अध्यक्षस्थानी होते. आमदार डॉ. सुधीर तांबे, हिरामण खोसकर, माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव, माजी आमदार जयप्रकाश छाजेड, शिरीषकुमार कोतवाल, ॲड. अनिल आहेर, काशिराम बहिरम, राजेंद्र मोगल, शहराध्यक्ष शरद आहेर, राजाराम पानगव्हाणे आदी उपस्थित होते.

..

भारतीय जनता पक्षाला काँग्रेस हा खऱ्या अर्थाने पर्याय आहे, ही बाब जनतेच्या ध्यानात आली आहे. सामान्य माणूस काँग्रेसकडे आशादायक नजरेने पाहतो आहे. त्यावरून काँग्रेसची सुप्त लाट तयार झाल्याचे आपणाला दिसते आहे. त्यामुळे आता कार्यकर्त्यांनी आतापासून सुरवात करावी. स्वबळावर निवडणुका लढवायच्या असल्यास तशी तयारी करणे आवश्‍यक आहे.

-बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com