Balasaheb Thorat Vs Sujay Vikhe : बाळासाहेब थोरातांचा विखेंच्या पराभवावर मोठा गौप्यस्फोट; आता लढाई विधानसभेची...

Balasaheb Thorat Explained The Reason For Sujay Vikhe Defeat : भाजपचे सुजय विखे यांच्या पराभवासाठी भाजपकडून मोठी मदत झाली. त्यांचा अहंकारामुळे भाजपने त्यांचा पराभव घडवून आणला. आता विधानसभेची लढाईसाठी आहे. विधानसभेच्या वेळी एकमेकांना साथ देऊन जागा दिल्या पाहिजेत, असेही बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.
Balasaheb Thorat Vs Sujay Vikhe
Balasaheb Thorat Vs Sujay Vikhe sarkarnama

Balasaheb Thorat And Sujay Vikhe : काँग्रेस ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सुजय विखे यांच्या अहंकारामुळे भाजपकडून त्यांच्या पराभवासाठी मोठी मदत मिळाल्याचा गौप्यस्फोट केला. त्यांना अनेक चुका भोवल्या. अनेक प्रकाराचे ताप गेले, आता खोकला राहिला, अशी टोलेबाजी करत आता विधानसभेची लढाई आहे. आता दहशत आणि कुट कारस्थान संपवायचे आहे. त्यासाठी विधानसभेला एकत्रपणे काम करण्याची तयारी सुरू करा, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.

काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची खासदार नीलेश लंके यांनी संगमनेरमध्ये भेट घेतली. यावेळी कार्यक्रमात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी विखेंच्या अहंकारावर भाष्य करत डिवचले. 'धनदांडगे आणि प्रस्थापितांविरोधातील मोठी लढाई नीलेश लंके यांनी जिंकली. लंकेंनी सर्वांचे अंदाज खोटे पाडले. इंग्रजीची अडचण खरी त्यांची झाली. भाषा हा अडथळा राहिला नाही. इंग्रजी भाषेचा बाऊ करणाऱ्यांना लोकांनी घरी बसवल्याचा टोला बाळासाहेब थोरात यांनी लगावला'.

Balasaheb Thorat Vs Sujay Vikhe
Ahmednagar Politics : नगर लोकसभा गमावलेला भाजप आता मोठी चाल खेळणार; थेट अजितदादांच्या नेत्याला मंत्री करणार?

धनदांडग्यांविरोधात लढाई लढताना ज्येष्ठ नेते शरद पवारसाहेबांच्या (Sharad Pawar) पठ्ठ्या नीलेश लंके यांना खूप त्रास झाल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. त्यांच्याविरोधात खोट्या केसेस सुरु झाल्या. त्यांच्या खासदारकीच्या मार्गात अडथळे उभारण्यात आले. सत्तेचा गैरवापर झाला. कार्यकर्त्यांना मारहाण झाली. सत्तेच्या त्रासातून नीलेश लंकेसारखे सर्वसामान्य नेतृत्व पुढे आले, असे थोरात यांनी सांगितले.

Balasaheb Thorat Vs Sujay Vikhe
Bhausaheb Wakchaure On Sadashiv Lokhande : सदाशिव लोखंडेंच्या विधानावर भडका; खासदार वाकचौरे आणि रुपवतेंचं जखमेवर मीठ

वाळू तस्करीतून दहशतवाद आणि सत्तेचा गैरवापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कुटील कारस्थानाच्या विरोधातील ही लढाई सोपी नव्हती, दोन महिने नियोजन करावे लागले. संवाद यात्रेत रात्री उशिरापर्यंत लोक जागे असत. शरद पवारसाहेबांचे मानावे तेवढे आभार थोडे आहेत. राष्ट्रवादी आणि आमच्याही चांगल्या जागा आल्या. आरोग्याचा प्रश्न असतानाही पवारसाहेब श्रीगोंद्याच्या सभेला आले. भाजपच्या अनेक जणांनी अप्रत्यक्षपणे मदत केल्याचा गौप्यस्फोट बाळासाहेब थोरात यांनी केला.

बाळासाहेब थोरात यांनी देशात आणि राज्यात वातावरण वेगळे आहे. भारतीय जनता पक्षाचाच उमेदवार येणार असल्याचे माध्यमे म्हणत होती. मात्र सर्वांचे अंदाज खोटे ठरले. आता दहशत आणि कुट कारस्थान संपवायचे आहे. विधानसभेच्या वेळी एकमेकांना साथ देऊन जागा दिल्या पाहिजेत, सर्वांनी सहकार्य केले पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com