Ahmednagar Politics : नगर लोकसभा गमावलेला भाजप आता मोठी चाल खेळणार; थेट अजितदादांच्या नेत्याला मंत्री करणार?

Cabinet Expansion News : नगरचे राज्यातील राजकीय महत्त्व अधोरेखित होते. मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी पुढील सात ते आठ दिवसात पाऊले उचलली जातील. विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसची काय डिमांड आहे, ती दिल्लीतील प्राथमिक चर्चेत मांडल्याचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले.
Sunil Tatkare And Sangram Jagtap
Sunil Tatkare And Sangram Jagtapsarkarnama
Published on
Updated on

Sunil Tatkare And Sangram Jagtap News : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्तारावर भाष्य करताच नगरला मंत्रिपद मिळणार, असे संकेत दिलेत.

"मंत्रिमंडळाचा विस्तारावर दिल्लीत प्राथमिक चर्चा झाली आहे. अधिवेशनापूर्वी विस्ताराचा आग्रह असेल. नगर विधानसभा मतदारसंघाचे संग्राम जगताप यांची आमदारकीची दुसरी टर्म आहे. त्यांच्या नावाची कधी चर्चा झाली नाही. पण कार्यकर्त्यांचा आग्रहानुसार आम्ही नाव पुढे घेऊन जावू", असे सुनील तटकरे यांनी म्हटले.

लोकसभा निवडणुकीत भाजपचे (BJP) उमेदवार सुजय विखे यांचा पराभव झाला. नगर जिल्ह्यात भाजपची पुरती पिछेहाट झाली. आगामी विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यातील शरद पवार यांचे वर्चस्व रोखण्यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला घेरण्यासाठी भाजप नगरमध्ये वेगळी खेळी करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा होत आहेत. या चर्चेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी नगर दौऱ्यावर असताना अधिकची हवा दिली. यामुळे नगरला मंत्रिपद मिळणार, असे संकेत मिळाले आहेत.

सुनील तटकरे म्हणाले, अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची प्राथमिक चर्चा दिल्लीत झाली आहे. मी आता दौऱ्यावर आहे. मझ्या दौऱ्याला नगरपासून सुरवात केली आहे. यातून नगरचे राज्यातील राजकीय महत्त्व अधोरेखीत होते. मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी पुढील सात ते आठ दिवसात पाऊले उचलली जातील. मंत्रिमंडळाच्या विस्तारातील राष्ट्रवादी काँग्रेसची काय डिमांड आहे, ती दिल्लीतील प्राथमिक चर्चेत सांगितली आहे. विस्तारावेळी नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली या चर्चेला अंतिम स्वरुप दिले जाईल, असे सुनील तटकरे यांनी सांगितले.

Sunil Tatkare And Sangram Jagtap
Ajit Pawar Vs Nilesh Lanke : अजितदादा अन् खासदार लंकेंमध्ये 'टशन' रंगणार, राणी लंकेंना कोण रोखणार?

सुनील तटकरे मंत्रिमंडळाच्या विस्तारावर पत्रकार परिषदेत बोलता असताना त्यांच्या शेजारी आमदार संग्राम जगताप बसले होते. त्यांनी आमदार संग्राम जगताप यांची दुसरी टर्म आहे, याकडे लक्ष वेधले. त्यांचे नाव कधी चर्चे आणि समोर आले नाही. परंतु त्यांचे संघटन कौशल्य आणि विधानसभ मतदारसंघातील काम पाहाता त्यांचा विचार करू. कार्यकर्त्यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा आग्रह धरला आहे. अजितदादांसमोर संग्राम जगताप यांचे मंत्रिपदासाठी नाव आम्ही नेणार आहोत, असे सांगितले. सुनील तटकरे यांनी संग्राम जगताप यांच्या नाव मंत्रिपदासाठी थेट घेतल्याने नगरमधील राष्ट्रवादी काँग्रेससह जगताप यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.

Sunil Tatkare And Sangram Jagtap
Ajit Pawar : अजित पवार गटामुळे झाला दिंडोरीत भाजपचा पराभव?

संगमनेरसह विधानसभेसाठी शुभेच्छा!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी जोराचा चिमटा काढला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष नगर जिल्ह्यात 12 जागा लढत असेल तर, आम्हाला आनंदच आहे. महाविकास आघाडी म्हणून 12 जागा लढण्याचा निर्णय अनुभूपूर्व असून तो संगमनेर सहित असेल तर, त्याचे स्वागत करतो आणि शुभेच्छा देतो, असे सुनील तटकरे यांनी म्हटले. खासदार नीलेश लंके यांनी नगर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघ शरद पवारांना जिंकून देणार असल्याची घोषणा वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com