Sharad Pawar Politics: `हरियाणा`ची पुनरावृत्ती नको, म्हणून महाविकास आघाडीची सावध पावले!

Maha Vikas Aghadi News: महाविकास आघाडीचे निर्णय का लांबताहेत? प्रत्येक जागेसाठी तिन्ही घटक पक्ष का आहेत एव्हढे सावध.
Jayant Patil, Nana Patole & Sanjay Raut
Jayant Patil, Nana Patole & Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Vidhan Sabha News: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र अद्यापही महाविकास आघाडीच्या काही मतदारसंघांचा घोळ कायम आहे. यामागे असलेले कारण आता स्पष्ट झाले आहे.

हरियाणा राज्यातील निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात निवडणुका होत आहेत. हरियाणामध्ये अत्यंत अनुकूल वातावरण असताना काही उमेदवारांचे निर्णय चुकले. चुकीच्या उमेदवारांमुळे काँग्रेस पक्षाला मोठा फटका बसला.

महाराष्ट्रात सत्ता येता येता राहिली. त्याचा मोठा नकारात्मक परिणाम इंडिया आघाडीच्या प्रतिमेवर झाला. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी अतिशय सावधपणे पावले टाकत आहेत.

महाविकास आघाडीत बहुतांशी जागांचा निकाल झाला आहे. त्याचे कारण गत निवडणुकीत ज्या मतदार संघाचा आमदार होता. ती जागा संकेतानुसार त्या पक्षाला देण्यात आली आहे. याशिवाय जिथे पक्षाचे विद्यमान आमदार आहे, तो मतदार संघ देखील संबंधितांना देण्यात आला आहे.

Jayant Patil, Nana Patole & Sanjay Raut
Narhari Zirwal Politics: नरहरी झिरवाळ अडचणीत; महायुतीत बंडाचा झेंडा फडकला!

यामध्ये बहुतांश मतदार संघाचा तिढा सुटला. ज्या मतदारसंघांवर एकाच वेळी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांचा दावा आहे, किंवा दोन पक्षांचा दावा आहे या मतदारसंघांबाबत तिढा वाढला आहे. या मतदारसंघांमध्ये इलेक्टिव्ह मेरिट असलेले उमेदवार कोण? याबाबत वरिष्ठ नेत्यांकडे असलेली माहिती भिन्नस स्वरूपाची आहे.

अनेक ठिकाणी काँग्रेसकडे असलेले उमेदवार कमकुवत आहेत. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे प्रभावी उमेदवार आहेत. त्यामुळे हे दोन्ही पक्ष हे मतदार संघ सोडण्यास तयार नाही. त्यामुळे ही चर्चा लांबली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठी अत्यंत प्रतिष्ठेचे आहे.

गेल्या महिन्याभरात पश्चिम महाराष्ट्र अतिशय मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. अनेक नेत्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. त्यामुळे हे मतदार संघ आणि तेथील उमेदवार ठरविताना पक्षाला अतिशय जिकीरीचा तणाव सहन करावा लागत आहे.

Jayant Patil, Nana Patole & Sanjay Raut
Girish Mahajan Politics: शरद पवारांनी डाव टाकला; गिरीश महाजन यांच्या विरोधात त्यांच्याच सहकाऱ्याला उमेदवारी!

अनेक प्रबळ इच्छुक असल्याने ही चर्चा सतत लांबत राहिली आहे. त्या तुलनेत नाशिक व अन्य भागातील मतदार संघ तेवढे महत्त्वाचे नाही. मात्र नाशिक पूर्व, सिन्नर, येवला, देवळाली यांसारख्या मतदार संघात अनेक जण उमेदवारीसाठी प्रवेश करण्यास उत्सुक आहेत.

या नेत्यांचा गेले तीन दिवस यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान कार्यालयात गराडा पडला आहे. हे उमेदवार `अपना नंबर कब आयेगा` याची प्रतीक्षा करत अक्षरशः गाडीतच झोपत आहेत. या उमेदवारांच्या समर्थकांचा उत्साह आणि प्रतीक्षा करण्याची क्षमता वाखाणण्याजोगी आहे.

या सर्व गोष्टींना हरियाणा विधानसभा मतदारसंघ दोन टक्के मतांच्या फरकाने काँग्रेस पक्षाला निर्णायक जागा गमवाव्या लागल्या. निर्णायक जागा कारणीभूत आहेत हरियाणाचा अनुभव लक्षात घेऊन महाविकास आघाडीचे काँग्रेस व अन्य पक्ष ताकही फुंकून पीत आहेत. यामुळेच आज सकाळी 11 ला होणारी संयुक्त पत्रकार परिषद संध्याकाळपर्यंत पुढे गेली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com