Girish Mahajan Politics: शरद पवारांनी डाव टाकला; गिरीश महाजन यांच्या विरोधात त्यांच्याच सहकाऱ्याला उमेदवारी!

Jamner Assembly constituency: जामनेर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने मंत्री महाजन यांच्या विरोधात त्यांच्याच सहकार्याला मैदानात उतरवल्याने जामनेरमध्ये चुरस.
Deelip Khodape & Girish Mahajan
Deelip Khodape & Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News: जामनेर मतदार संघात राजकीय वातावरण तापले आहे. काल या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी उमेदवाराची घोषणा केली. त्यावेळी अगदी मध्यरात्री देखील राष्ट्रवादीच्या समर्थकांनी जल्लोष केला.

गेली सहा टर्म जामनेर मतदार संघातून ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आमदार आहेत. भाजपचे नेते म्हणून त्यांचा पक्षाच्या यंत्रणेवर देखील प्रभाव आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे सहकारी आणि पक्षाचे संकट मोचक अशी त्यांची प्रतिमा आहे.

यंदा त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी त्यांना मोठे आव्हान दिले आहे. त्यामुळे स्वतः मंत्री महाजन संकटात येतात की काय अशी स्थिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष पाटील यांनी काल रात्री दिलीप खोडपे यांना दूरध्वनी करून उमेदवारी देत असल्याचे जाहीर केले.

यावेळी त्यांनी श्री खोडपे यांचे अभिनंदन केले. आज श्री खोडपे यांना एबी फॉर्म दिला जाणार आहे. त्यामुळे पहिल्यांदाच जामनेर मतदार संघात प्रस्थापित मंत्री महाजन यांना मोठे आव्हान निर्माण झाले आहे. गिरीश महाजन यांचे जवळचे सहकारी आणि महाजन यांचे कट्टर विरोधक एकनाथ खडसे यांचे सहकारी भाजप नेते तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष म्हणून श्री खोडपे परिचित आहेत.

Deelip Khodape & Girish Mahajan
Sharad Pawar : साहेबांचा आदेश, मतदारसंघात जा; `एबी फॉर्म`ने वाढवली इच्छुकांची घालमेल!

तळागाळातील कार्यकर्त्यांची संपर्क आणि काम करणाऱ्या कार्यकर्ता अशी त्यांची प्रतिमा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी यावेळी एकत्र येऊन मोठा राजकीय डाव टाकला. राष्ट्रवादीच्या सर्व स्थानिक इच्छुकांनी उमेदवारीचा मोह टाळत एक मताने श्री खोडपे यांना उमेदवारी देण्याचा आग्रह पक्षाकडे धरला.

त्यानंतर श्री खोडपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांना आता उमेदवारी जाहीर झाली आहे. मंत्री गिरीष महाजन यांनी एक महिन्यापासूनच प्रचार सुरू केला आहे.

त्यामुळे यंदाची निवडणूक भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात चांगलीच रंगेल अशी स्थिती आहे. उमेदवारी जाहीर झाल्यावर श्री खोडपे यांनी आनंद व्यक्त करीत हे श्रेय कार्यकर्त्यांचे आहे, असे सांगितले.

Deelip Khodape & Girish Mahajan
Nashik District Politics: कार्यकर्त्यांच्या नशीबी उपेक्षा कायम, नेते मात्र घर भरण्यासाठी सज्ज!

ते म्हणाले जामनेर मतदार संघाला आता आपल्याला सामान्य कार्यकर्ता आमदार म्हणून द्यायचा आहे. पहिल्या निवडणुकीत मंत्री महाजन यांनी तुम्हाला आमदार नव्हे सालदार म्हणून मी काम करणार आहे, असे सांगितले होते.

मात्र आता हे सालदार मालदार झाले आहेत. ते जनतेचे मालक बनले आहेत. आता या मालदाराकडे पोती भरून पैसे आहेत. ते पैसे देतील तेव्हा घ्या दिवाळी साजरी करा. मात्र मतदान तुतारीलाच द्या. यंदाच्या निवडणुकीत जनतेने ठरवले असून तुतारीच वाजणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

मंत्री महाजन यंदा सातव्यांदा जामनेर मतदार संघातून निवडणूक लढवीत आहेत. गेल्या सहा निवडणुकांमध्ये त्यांना मतदारांचा सामाजिक आणि राजकीय पाठिंबा मिळाला आहे. मात्र यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. बहुजन समाजाचे श्री खोडपे उमेदवार आहेत. या सामाजिक समीकरणांमुळे आणि सर्व समाज एकत्र आल्यामुळे महाजन विरुद्ध खोडपे ही निवडणूक रंगण्याची चिन्हे आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com