Jalgaon Politics: ‘संकटमोचक’ मंत्री गिरीश महाजन जळगावकरांसाठी निरूपयोगी?

Banana producers appeal all three ministers of Jalgaon-धनंजय मुंडेंनी एका फटक्यात जळगावच्या तिन्ही मंत्र्यांना गुंडाळल्याने शेतकऱ्यांत नाराजी
Girish Mahajan & Dhanajay Munde
Girish Mahajan & Dhanajay MundeSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon Farmers issue : केळी उत्पादन हे जळगावच्या शेतीचे मुख्य पीक आहे. मात्र, या शेतकऱ्यांना आश्वासन देऊनही कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत अचानक घूमजाव करीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे याबाबत केळी उत्पादकांत मोठी नाराजी पसरली आहे. (Agriculture Minister`s decision will affect the politics of Jalgaon)

केळीचा पीकविमा हा जळगावच्या (Jalgaon) शेतकऱ्यांचा (Farmers) अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यावर कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी घूमजाव केले. त्यामुळे राज्याच्या सरकारमधील पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांसह जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

Girish Mahajan & Dhanajay Munde
Eknath Khadse : अफरातफर करणाऱ्यांना भाजप पाठीशी का घालत आहे?

केळी पीकविमा योजनेत केळी उत्पादकांना सरसकट विमा मिळण्याचे आश्वासन जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांनी दिले होते. मात्र, मुंबईच्या बैठकीत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी घूमजाव करून शेतकऱ्यांना संभ्रमात टाकले आहे. राज्यातील अनेक प्रश्न सोडविणारे ‘संकटमोचक’ जिल्ह्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्यासह तिन्ही मंत्र्यांनी हे संकट दूर करावे, अशी अपेक्षा केळी उत्पादकांकडून व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात सुमारे ८० हजार हेक्टर क्षेत्रात शेतकऱ्यांनी केळी पीकविमा काढला आहे. विमा कंपनीतर्फे ३७ हजार हेक्टर क्षेत्राचे जिओ टॅगिंग पूर्ण झाले नाही. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात विमा रक्कम मिळायला हवी होती. मात्र, ती मिळाली नाही. याबाबत ‘सकाळ’ने शेतकऱ्यांची समस्या मांडली.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, तालुकाध्यक्ष किशोर पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. तसेच, जिल्हा बैठकीत मंत्री महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील व अनिल पाटील या तिन्ही मंत्र्यांनी १२ टक्के विलंब शुल्कासह सरसकट विमा देण्याचे आश्वासन भाजप जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळके यांना दिले होते.

मात्र, मुंबईत झालेल्या बैठकीत कृषिमंत्री मुंडे यांनी जळगाव जिल्ह्याची पाहणी (जिओ टॅगिंग) करावी, यासाठी राहुरी कृषी विद्यापीठाची मदत घ्यावी, असे निर्देश दिल्याने जिल्ह्यातील शेतकरी संभ्रमात पडले आहेत. गारपीट, वादळी तडाखा, पूर यामुळे केळीचे नुकसान झाले. हिवाळा व उन्हाळ्यात कमी-अधिक प्रमाणात केळी करपली. केळी पीक कापणी झाली. यामुळे बागेत केळी नाहीत. परिणामी केळी पीकविमा काढलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात खाली शेत किंवा इतर पिके किंवा नवीन केळी लागवड झालेली आहे.

Girish Mahajan & Dhanajay Munde
Nashik Onion Politics : कांदा प्रश्न खासदार, आमदारांची झोप उडवणार?

प्रशासनाच्या विनंतीवरून ‘राष्ट्रवादी’ने मोर्चा रद्द केला होता. याबाबत ‘संकटमोचक’ मंत्री गिरीश महाजन यांच्यासह तिन्ही मंत्र्यांनी सरसकट विमा मिळवून द्यावा, अशी अपेक्षा विमाधारक शेतकरी करीत आहेत.

Girish Mahajan & Dhanajay Munde
Rohit Pawar News : भाजपमध्ये जाण्याचा निर्णय का बदलला? रोहित पवारांचे विरोधकांना खोचक उत्तर; म्हणाले, 'मोदी-शाहांसोबत बैठक...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com