मुंबई : भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांना अयोध्येचा दौरा रद्द करावा लागला आहे. अयोध्येत मनसे कार्यकर्त्यांना अडकवण्यासाठी महाराष्ट्रात सापळा रचण्यात आल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. तर सिंग यांच्याकडून त्यांना सातत्याने आव्हान दिले जात आहे. यानंतर आता मनसेने ब्रिजभूषण यांच्या विरोधात आघाडी उघडल्याचे दिसते. (MNS Latest Marathi News)
दादर मधील मनसे उपशाखाध्यक्ष लक्ष्मण पाटील आणि मनसे जनहीत कक्षाचे वकील दादर पोलिस ठाण्यात पोहचले आहेत. ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी त्यांनी पोलीस ठाणं गाठलं आहे. ब्रिजभूषण यांनी जिथे राज ठाकरे भेटतील तिथे दोन हात करीन, या वक्तव्यावरून तक्रार केली जाणार आहे. (MNS will complaint against BJP MP Brijbhushan Singh)
दोन भाषिकांमध्ये तेढ आणि कायदा सुव्यवस्था बिघडवला जात आहे, म्हणुन सिंग यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मनसेची मागणी आहे. मनसेचे जनहीत कक्षाचे वकील ॲड. गजणे, ॲड. रवी पाष्टे, उपविभाग अध्यक्ष शशांक नागवेकर आदी पोलीस ठाण्यात उपस्थित आहेत. ब्रिजभूषण सिंग यांच्यावर गुन्हा नोंद झाल्यास हा त्यांच्यावरील महाराष्ट्रातील पहिला गुन्हा ठरेल.
ब्रिजभूषण सिंह अजूनही आक्रमक
बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंना नुकतेच पुन्हा आव्हान दिलं आहे. केवळ उत्तर प्रदेशच नव्हे तर संपूर्ण उत्तर भारतात राज ठाकरेंना माफी मागितल्याशिवाय एंट्री नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.
गुजरातमध्येही उत्तर भारतीय नागरिकांना त्रास देण्यात आला पण त्यांच्याकडून कुणीही माफी मागितली नाही, असा मुद्दा राज ठाकरेंनी उपस्थित केला होता. यावर बोलताना बृजभूषण म्हणाले होते की, गुजरात, पंजाबमध्येही उत्तर भारतीयांना त्रास देण्यात आला. पण महाराष्ट्रात उत्तर भारतीयांविरोधात दहशतीचे, द्वेषाचे वातावरण राज ठाकरेंनी तयार केले. त्या तुलनेत गुजरात, पंजाबमध्ये एवढा त्रास दिला नाही.
राज ठाकरेंना माफी मागायला सांगितल्यापासून दररोज मनसे कार्यकर्त्यांचे मला फोन येत आहेत. ते उर्मटपणे बोलतात, पण मी कधीच त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर देत नाही. मला त्या कार्यकर्त्यांची कीव येते. राज ठाकरेंनी स्पष्टपणे त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे नाव घ्यावे. कुणी सापळा रचला त्यांचे नाव घेण्यापासून त्यांना कुणी रोखले आहे, असा प्रश्नही ब्रिजभूषण यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.