Nashik Police: पुण्यात कार्यरत होता बांगलादेशी एजंट; बिल्डर्सच्या साईटवरील मजूर संशयाच्या भोवऱ्यात?

Bangladeshi infiltrators-Policemen became construction workers, their performance was successful-बांगलादेशी एजंट बारा वर्ष पुणे शहरातून ऑपरेट करत होता बांगलादेशी नागरिक
Sandeep Karnik
Sandeep KarnikSarkarnama
Published on
Updated on

Nashik Police News: बांगलादेशी नागरिकांबाबत पोलिस महासंचालकांनी राज्यभर अलर्ट जारी केला आहे. भाजपच्या सरकारकडून हा विषय प्राधान्याचा करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या बांगलादेशी नागरिकांचा ठिकठिकाणी शोध घेतला जात आहे.

यासंदर्भात नाशिकच्या पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. त्यासाठी त्यांनी नेहमीचा शिरस्ता न वापरता पोलीस अधिकारी चक्क लेबर सुपरवायझर तर पोलीस कर्मचारी मजूरांचे वेषांतर केले होते. त्यांनी एका मोठ्या बांधकाम साइटवर पाच दिवस रेकी केली. मजुरी केली.

Sandeep Karnik
Police Sandeep karnik: पुण्यात १२ वर्षे रहात होता एजंट, वेषांतर करून पोलिसांनी पकडले ८ बांगलादेशी!

पोलिसांनी नाशिक येथील एका साईटवर रेकी करताना चक्क वाळू, विटा आणि बांधकाम साहित्य डोक्यावरून वाहिले. दिवसभर इतर मजुरांसारखी मेहनत घेऊन अन्य मजूरांचा विश्वास संपादन केला. त्यातून त्यांच्या हाती आठ बांगलादेशी नागरिक असलेले मजूर हाती लागले. ही मोठी कारवाई मानली जाते.

Sandeep Karnik
Santosh Deshmukh Murder: सुर्यवंशी, देशमुख हत्येचे प्रकरण देवेंद्र फडवणीसांना स्वस्थ बसू देईना!

यामध्ये पोलिसांना सुमन कलम गाझी, अब्दुल्ला अलीम मंडल, शाहीन मफिजुल मंडल, लासेल नूर अली शंतर, आसाद अर्शद अली मुल्ला, आली सुहान खान मंडल, अल अमीन आमीनुर शेख आणि मोहसीन मौफिजुल मुल्ला या आठ बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले.

हे सर्व कागदपत्रांशिवाय भारतात अनधिकृत वास्तव्य करीत होते. ही कारवाई सध्या राज्यभर चर्चेचा विषय बनली आहे. विशेषतः मालेगाव येथे भाजप नेते किरीट सोमय्या सातत्याने दौरे करून आरोप करीत आहेत. मात्र तेथे एकही बांगलादेशी किंवा रोहिंग्या मुस्लिम सापडलेला नाही. नाशिक पोलिसांच्या परिश्रमाला यश आले.

बांगलादेशी नागरिकांचा शोध हा राजकीय विषय न घेता, पोलीस तपासाचा भाग बनवला तर त्यात मोठे यश येईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे यामध्ये पुणे शहरात एक बांगलादेशी एजंट गेली बारा वर्ष काम करीत असल्याचे उघडकीस आले. हा एजंट विविध बांधकाम व्यावसायिकांना मजूर पुरवतो.

बांगलादेशातून सीमेवरून पश्चिम बंगालला हे नागरिक येतात. तेथून एजंटच्या माध्यमातून त्यांना कागदपत्र उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले जातात. शासकीय यंत्रणेला लाच देऊन अशी कागदपत्र करणाऱ्यांचे मोठे रॅकेट सक्रिय आहे. तेथून भारतातील अन्य शहरांतील एजंटची संपर्क केला जातो. त्यानंतर या बांगलादेशींना मजुरीसाठी तेथे पाठविले जाते.

पुणे शहरात आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरू आहे. त्या दृष्टीने राज्य गुन्हे अन्वेषण आणि महाराष्ट्र पोलिसांच्या विशेष शाखेला नाशिकच्या पोलिसांकडून माहिती कळविण्यात आली आहे. आगामी काळात मोठ्या शहरांमधील बांधकाम साइट आणि अन्य ठिकाणी बांगलादेशी नागरिकांचा शोध घेतला जाऊ शकतो.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com