Santosh Deshmukh Murder: सुर्यवंशी, देशमुख हत्येचे प्रकरण देवेंद्र फडवणीसांना स्वस्थ बसू देईना!

Somnath Suryavanshi; Somnath Suryavanshi and Santosh Deshmukh murder, Parbhani to Mumbai march for justice-परभणीतील कार्यकर्त्यांनी पोलिसांवरील कारवाईसाठी परभणी ते मुंबई मार्च काढला.
Somnath Surywanshi & Santosh Deshmukh
Somnath Surywanshi & Santosh DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Somnath Suryavanshi Murder: भारतीय संविधानाच्या प्रश्नावर संघर्ष करणारे सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. या प्रकरणात अद्यापही योग्य कारवाई झाली नसल्याचा आरोप होत आहे.

या संदर्भात परभणी येथील कार्यकर्त्यांनी मार्च सुरू केला आहे. हा मार्च उद्या नाशिकला येऊन धडकणार आहे. परभणीहून निघालेला हा मार्च थेट मुंबईला जाऊन राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागणार आहे. या मोर्चेकऱ्यांचा राज्याच्या पोलिस यंत्रणेवर संताप आहे.

Somnath Surywanshi & Santosh Deshmukh
Chhagan Bhujbal : भुजबळांची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले, मविआ सरकारच्या काळातील 'ही' योजना यापुढेही सुरुच ठेवा...

परभणी येथे समाजकंटकांनी दंगल घडवून आणली. यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांना विनाकारण अटक करण्यात आली. पोलिसांच्या मारहाणीत त्यांचा कोठडीतच मृत्यू झाला. मात्र हा मृत्यू दडवण्यासाठी सबंध पोलीस प्रशासन धावपळ करीत आहे. या प्रकरणातील दोशी पोलिसांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

Somnath Surywanshi & Santosh Deshmukh
Mahayuti Politics: देवेंद्र फडणवीस शिवसेना उद्धव ठाकरेंना दमवणार, महापालिका निवडणूक अनिश्चित?

या संदर्भात पुण्याचे माजी महापौर रवी सोनकांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राज्य शासनाला इशारा दिला आहे. आतिश वाकोडे, सिद्धार्थ भराडे, सुधीर माळवे, निलेश डुमणे आदींनी नाशिक येथे पत्रकार परिषद घेतली. राज्य सरकारने पोलिसांना बडतर्फ करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.

सरपंच देशमुख यांची अतिशय क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. त्यामुळे सबंध महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटले आहे. अद्यापही या प्रकरणातील एक आरोपी फरार आहे. यातील मुख्य करता करविता आणि राजकीय नेता अद्यापही अलिप्तच आहे. त्यामुळे राज्य सरकारची प्रतिमा देखील डागाळली आहे.

या दोन्ही प्रकरणांच्या निषेधार्थ परभणी निघालेला हा मार्च मुंबईला पोहोचणार आहे. मुंबईला थेट गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करण्यात येणार आहे. हा मार्च आता नाशिकला पोहोचणार असल्याने फडणवीस यांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

या संदर्भात मार्च काढणारे कार्यकर्ते आणि माजी महापौर सोनकांबळे अतिशय आक्रमक आणि संतप्त आहेत. पोलिसांवर कारवाई करण्यात राज्य शासन का मागे सरत आहे? असा प्रश्न त्यांनी केला. याबाबत मुंबईला न्याय न मिळाल्यास दिल्लीपर्यंत धडक देऊ, असा इशारा त्यांनी दिला आहे.

गेले दीड महिना सरपंच देशमुख आणि पोलीस कोठडीत मृत झालेल्या सूर्यवंशी यांचे प्रकरण राज्यभर चर्चेत आहे. याबाबत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. याबाबत अद्यापही सरकारकडून आंदोलकांचे आणि जनतेचे समाधान होईल, असा निर्णय आणि कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे विविध भागात आंदोलन होतच आहेत.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com