Karnataka Congress crisis : 40 आमदार नाराज, मनधरणीत दमछाक; सूरजेवालांची आमदारांना पक्षाच्या चौकटीतच राहण्याची ताकीद

Karnataka Congress Randeep Surjewala Holds Meetings with Dissident MLA : कर्नाटक राज्यातील काँग्रेस आमदारांना शांत करण्यासाठी दुसऱ्या फेरीच्या चर्चेला प्रदेश काँग्रेस प्रभारी रणदीपसिंग सूरजेवाला यांनी सुरवात केली.
Karnataka Congress crisis
Karnataka Congress crisisSarkarnama
Published on
Updated on

Karnataka political developments : राज्य सरकारवर नाराज असलेल्या कर्नाटक राज्यातील काँग्रेस आमदारांना शांत करण्यासाठी दुसऱ्या फेरीच्या चर्चेला प्रदेश काँग्रेस प्रभारी रणदीपसिंग सूरजेवाला यांनी सुरवात केली.

पहिल्या टप्प्यात बेळगाव आणि गुलबर्गा जिल्ह्यातील काँग्रेस आमदारांची स्वतंत्र बैठक घेतली आणि त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. कोणत्याही आमदाराने पक्ष अडचणीत येईल, असे जाहीर वक्तव्य करू नये, अशी ताकीदही त्यांनी दिली.

काँग्रेसच्या (Congress) सूरजेवाला यांनी सांगितले की, जर आमदारांना काही समस्या असतील, तर त्या आमच्या लक्षात आणून द्या. आम्ही त्या सोडविण्याचा प्रयत्न करू. उघडपणे बोलू नका. कारण त्यामुळे विरोधी पक्षांना टीका करण्यास हत्यार मिळेल. आम्ही सर्व समस्यांवर उपाय शोधण्यासाठी काम करू, असे ठासून सांगितले.

काहीही झाले तरी पक्षाच्या चौकटीतच सर्व गोष्टींवर चर्चा झाली पाहिजे. मतदारसंघाच्या विकासाबाबत तुमच्या समस्या ऐकल्या आहेत. सर्व आमदारांची मते जाणून घेऊन ती हायकमांडला कळवू. त्यानंतर काँग्रेस हायकमांड प्रत्येक गोष्टीवर तोडगा काढण्यासाठी काम करेल. आमदारांनी धीर धरावा. सरकारविरुद्ध वक्तव्ये करू नका, असे सूरजेवाला यांनी आमदारांना सांगितले.

Karnataka Congress crisis
Karjat Extortion Case : सभापती शिंदेंशी जवळीक पवारांना खुपतेय; खंडणीच्या गुन्ह्यात जामीन मिळताच राजेभोसलेंचा हल्लाबोल

गृहनिर्माण विभागात घर वाटपासाठी लाच घेतली जात आहे, असा आमदार बी. आर. पाटील यांचा आरोप होता. विकास झाला नाही, तर राजीनामा देईन, असे आमदार राजू कागे यांनी विधान केले. डी. के. शिवकुमार (D K Shivakumar) यांना मुख्यमंत्री बनवावे, असे आमदार इक्बाल हुसेन यांनी सांगितले होते. सप्टेंबरमध्ये प्रदेश काँग्रेसमध्ये क्रांती होईल, असे मंत्री राजण्णा यांनी म्हटले होते.

Karnataka Congress crisis
Marathi Morcha : शेकडो मनसैनिकांना नोटिसा; मराठीसाठी पुन्हा मोर्चा, मुंबईतील वातावरण तापलं

40 आमदारांशी चर्चा

यावर काँग्रेस हायकमांडने सूरजेवाला यांना आमदारांशी बोलून त्यांच्या समस्यांवर उपाय शोधण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार 30 जून रोजी राज्यात आलेल्या बंगळूर आणि म्हैसूरमधील 40 हून अधिक आमदारांशी बोलून तीन दिवस घालवणारे सूरजेवाला दिल्लीला रवाना झाले होते. त्यानंतर सोमवारी पुन्हा ते बंगळूरला परतले आणि आमदारांशी दुसऱ्या फेरीत चर्चा केली. बंगळूर इथल्या काँग्रेस कार्यालयातील इंदिरा गांधी भवनात त्यांच्यासोबत स्वतंत्र बैठकीत आमदारांचे म्हणणे त्यांनी ऐकून घेतले.

बैठकांचा जोर, चर्चेचे गुऱ्हाळ

प्रथम बेळगावच्या आमदारांची बैठक झाली. त्यांच्याशी झालेल्या चर्चेत सूरजेवाला यांनी बेळगाव, बागलकोट आणि विजापूर जिल्ह्यांतील आमदारांशी संवाद साधला. यानंतर गुलबर्गा आणि बळ्ळारी जिल्ह्यातील आमदारांची स्वतंत्र बैठक घेतली आणि त्यांची मते जाणून घेतली. आज ते विजयनगर, रायचूर, कोप्पळ, हुबळी-धारवाड आणि उत्तर कर्नाटकातील आमदारांची बैठक घेतील. बुधवारी हावेरी, चित्रदुर्ग, दावणगेरे, शिमोगा आणि तुमकूर जिल्ह्यांतील आमदारांशी बैठक घेतील.

तक्रारींचा महापूर

सूरजेवाला यांच्याकडे बेळगाव आणि विजापूर जिल्ह्यातील आमदारांकडून काही मंत्र्यांविरुद्ध तक्रारी आल्या आहेत. ज्यात काही मंत्री त्यांचे काम करत नसल्याची तक्रार आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या आमदारांच्या बैठकीत अनेक आमदारांनी काही मंत्र्यांविरुद्ध तक्रारींचा महापूर आणला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com