Bharat Ratna Award : निवडणुकांच्या तोंडावर 'भारतरत्न'; रोहित पवारांचा अजितदादांसह मुख्यमंत्र्यांना टोला

Rohit Pawar on Bharat Ratna Award : भारतरत्न पुरस्कारावरून राजकारण रंगलं...
Rohit Pawar
Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar Politics Latest News :

केंद्रातील भाजप प्रणित एनडीए सरकारने गेल्या 18 दिवसांत पाच 'भारतरत्न' पुरस्कार जाहीर केले आहेत. 'भारतरत्न' पुरस्कार ज्यांना जाहीर झाला ते स्वागतार्ह आहे. पण सद्यस्थितीला निवडणुकांच्या तोंडावर 'भारतरत्न' दिले जात असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार Rohit Pawar यांनी याकडे लक्ष वेधत केंद्र सरकारच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली आहे.

Rohit Pawar
Shirdi Lok Sabha Constituency : शिर्डीमधून खासदार सदाशिव लोखंडेंच्या हॅटट्रिकमध्ये जागावाटपाचा अडसर

केंद्र सरकारने गेल्या 18 दिवसांत पाच जणांना 'भारतरत्न' हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर केले आहेत. 23 जानेवारीला बिहारचे माजी मुख्यमंत्री व समाजवादी नेते कर्पूरी ठाकूर, त्यानंतर माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना तीन फेब्रुवारी, तसेच माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह, पी. व्ही. नरसिंह राव आणि हरित क्रांतीचे प्रणेते एम. एस. स्वामिनाथन यांना नऊ फेब्रुवारीला 'भारतरत्न' पुरस्कार केंद्र सरकारने जाहीर केले. एक वर्षात पाच जणांना भारतरत्न जाहीर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. 1999 मध्ये चार जणांना 'भारतरत्न' पुरस्काराने गौरविण्यात आले होते. यंदा जाहीर झालेल्या पाच 'भारतरत्नां'पैकी चार मरणोत्तर आहेत.

आमदार रोहित पवार यांनी 'भारतरत्न' पुरस्कार ज्यांना जाहीर झाले आहेत, ते स्वागतार्ह आहे, असे सांगून 'भारतरत्न' पुरस्कार जाहीर करण्यामागे केंद्र सरकारच्या भूमिकेवर वेगळीच शंका उपस्थित केली आहे. आमदार पवार यांनी त्यांच्या एक्स खात्यावर याबाबत सविस्तर पोस्ट शेअर केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सामाजिक न्यायाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांना 'भारतरत्न' देण्याची महाराष्ट्राची आग्रही मागणी असल्याकडे आमदार पवार यांनी लक्ष वेधले.

सद्यस्थितीला निवडणुकांच्या तोंडावर भारतरत्न दिले जात असल्याची चर्चा सर्वसामान्यांमध्ये सुरू असल्याकडे आमदार पवार यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर का होईना महाराष्ट्रातल्या या अफाट कर्तृत्वांच्या बाबतीतही केंद्र सरकारने विचार करायला हवा. स्वतःला बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार म्हणवणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुरोगामित्वाच्या विचारधारेवर कथित वाटचाल करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सरकार नक्कीच पाठपुरावा करतील, अशी अपेक्षा देखील आमदार पवार यांनी व्यक्त केली आहे.

Rohit Pawar
Loksabha Election 2024 : शिर्डीत रंगणार शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना, उद्धव ठाकरेंनी ठोकला शड्डू तर...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com